राम कृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटन करी…भाजपा नेत्या चित्रा वाघ
बारामती : तोंडाने म्हणायचे राम कृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटन करी अशा सुप्रिया सुळे यांचे व्हिडीओ पाहून वाईट वाटते आहे. तर सुळे यांचे मानसिक संतुलन ढासळले आहे यावरून मला हसायला येते अशा शब्दात भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांची खिल्ली उडविली.
पुढे पत्रकारांशी बोलताना वाघ म्हणाल्या की, सुप्रिया सुळे या बेरोजगारी, महागाई आणि भ्रष्टाचार यावर अंकुश आणायचा आहे असे व्यक्त करीत आहेत त्यावर मोठ्या ताई, मोठ्या ताई कीती बोलणार आडीज वर्षे सरकारमध्ये होत्या त्यांनी काय केलं ? असा सवाल उपस्थित करीत कथनी आणि कारणी यामध्ये फरक असतो, ज्यावेळी सत्तेत असता त्यावेळी सगळे विसरून जाता आणि विरोधात आल्यावर सगळं आठवते , आजच्या घडीला पंचवीस कोटी नागरिकांना बीपीएल मधुन बाहेर काढायचे काम मोदी सरकारने केले, आकराव्या नंबरवर कॉंग्रेसने ठेवलेला भारत हा पाच नंबरवर आणायचे काम मोदिसरकारणे केले, अनेक योजना आणल्या आहेत. त्यामुळे विकासाचे वारे आहे त्या काय बोलतात त्याला फार महत्व नाही, मात्र त्यांची परिस्थिती पाहून मला फार हसायला येतेय, कारण त्या ताटली घेऊन जातात ओवाळणी करागं, फोटो काढा ही अवस्था पाहून वाईट वाटते आहे, या राज्याच्या मोठ्या ताई आहेत ना त्या ? तर गाडीत कोणातरी बसवायचे त्याचा रील काढायचा तो समाजमाध्यमात पसरवायचा आणि खाली लिहायचे ताई आपल्या हक्काच्या… कारण मोठ्या ताई आहेत ना त्या ? हे विकासाचे आणि हक्काचे काम त्यांनी केले आहे, बाकी बारामतीच्या विकासाचे आणि कार्य अहवालाचे बोलत आहेत ती सर्व कामे अजित दादांनीच केली आहेत, तोंडाने म्हणायचे राम कृष्ण हरी आणि चतुर्थीला खायची मटन करी…. अशा शब्दात वाघ यांनी सुळे यांची खिल्ली उडवीली.
संजय राऊत कोंग्रेसच्या फडावर तुणतुणे घेऊन नाचायचे काम करतात
नरेंद्र मोदी यांनी भटकता आत्मा म्हणत असताना कोणाचेच नाव घेतले नाही, मग साहेबांनी का स्वतःच्या जीव्हाला लावून घेतले हा मोठा प्रश्न पडला आहे. तर खा. संजय राऊत तो त काय सर्वज्ञानीच आहे. तो कोंग्रेसच्या फडावर तुणतुणे घेऊन नाचायचे काम करीत आहे, हे शंभर वेळा मी बोलले आहे. लोकांना फसवून, घोटाळ्यामध्ये जामिनावर सुटलेला आरोपी आहे तो अशा शब्दात वाघ यांनी खा. संजय राऊत यांना फटकारले.
