मोदींना प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांमध्ये नाही…आ.रोहित पवार.

बारामती : बारा लाख कोटींचे प्रोजेक्ट राज्यातून गुजरातला नेले ते परत कधी आणणार ते मोदी साहेबांनी सांगितले पाहिजे असा प्रश्न विचारण्याचे धाडस त्यांच्या सोबत गेलेल्या नेत्यांमध्ये नाही मात्र आम्ही प्रश्न विचारणार असा निर्धार आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला.
बारामतीत सुप्रिया सुळे यांच्या प्रचारानिमित्ताने आ. रोहित पवार बारामती तालुक्यातील देऊळगाव रसाळ येथे पत्रकाराशी बोलत होते. पुढे आ. रोहित पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यातील सभेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका करताना त्यांना ‘भटक्या आत्म्याची उपमा दिली यावर आमदार रोहित पवारांना प्रश्न विचारल्या नंतर ते म्हणाले, मोदी साहेबांची आता मोठी अडचण झाली आहे. काल त्यांना असं वाटत होतं की, पुण्यातील सभा खूप मोठी होईल, मात्र स्टेजच्या समोरून साठ टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. चार उमेदवारांच्या प्रचार सभेत साठ टक्के खुर्च्या रिकाम्या, म्हणजेच त्यांच्या लक्षात की, महायुतीच्या पुणे जिल्ह्यातील चारही जागा निवडून येणाऱ्या नाहीत, त्यामुळेच ते विचलित झाले असावे. मोदीसाहेब विकासावरून ते भटकत्या आत्म्यावर आले असावेत अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्यावर टीका केली.
मी किती शिकलोय, काय शिकलोय, याचं काय घेणं देणं आहे. मी बारामती, वालचंदनगर, मुंबई या ठिकाणी शिकलो. मी ग्रॅज्युएट आहे. मला डबल ग्रॅज्युएट व्हायचे होते. मात्र मला होता आले नाही, कारण माझ्या वडिलांच्या व्यवसायात अडचणी आल्या होत्या, त्यामुळे वडील अडचणीत असताना वडिलांबरोबर राहणं ही आपली परंपरा आहे. मी पुढे शिकू शकलो नाही. अशा शब्दात आ. रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर दिले.
मला देशाच्या बाहेरही शिकण्याची इच्छा होती, मात्र माझे दोन भाऊ जय आणि पार्थ हे भारताच्या बाहेर शिकले, याचा मला आनंद आहे. कितीही शिकवून आपल्याला आपल्या विचाराने जगता आले नाही तर त्या शिक्षणाचा काय उपयोग ? मी, आजी – आजोबांचा, आई – वडिलांचा विचार जपत आहे असेही व्यक्त केले.
अजित दादांकडे आता बोलायला काहीच राहिलं आहे का ? दादा आज जर भाजपच्या नादी लागून पवार साहेबांनी काय केले ? असा प्रश्न विचारीत आहेत. यावरून असे दिसते की, त्यांचा उमेदवार निवडून येणार नाही, त्यामुळे त्यांना काय बोलायचे हे कळत नसावे आसा आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला.