October 24, 2025

बारामती लोकसभा मतदार संघातील टपाली मतदान वेळापत्रक जाहीर

voting-in-india_20180151530
बारामती : जिल्ह्यात पहिल्यांदाच ८५ वर्षावरील ज्येष्ठ,  दिव्यांग नागरिक  तसेच अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदानाची सुविधा तसेच मतदान कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी मतदान सुविधा केंद्रे स्थापन करून तेथे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून बारामती लोकसभा मतदार संघातील या मतदानाचे वेळापत्रक निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी जाहीर केले आहे.
दौंड विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया १ ते ३ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते ३ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ४ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.
इंदापूर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया ३० एप्रिल ते १ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) २ ते ४ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) २ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.
बारामती विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया १ ते २ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते ३ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ४ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.
पुरंदर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया २ व ३ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते ३ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ४ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.
भोर विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया २ ते ४ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) १ ते २ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) ३ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे.
खडकवासला विधानसभा मतदार संघात ८५ वर्षावरील ज्येष्ठ, दिव्यांग नागरिक यांच्या घरी जाऊन मत नोंदवून घेण्याची प्रक्रिया १ ते २ मे दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतदान केंद्रे (पीव्हीसी) २९ एप्रिल ते १ मे दरम्यान तर निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी कर्मचाऱ्यांचे मतदान सुविधा केंद्रावर (एफसी) २ ते ६ मे रोजी नोंदवून घेण्यात येणार आहे, असेही बारामती लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

You may have missed

error: Content is protected !!