महाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नाही का ? …आ. रोहित पवारांचा पंतप्रधांना सवाल
बारामती : मतदान सुरु होताच केंद्र सरकारने गुजरातचा कांदा निर्यातीला परवानगी दिली मात्र महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे आश्रु मात्र केंद्र सरकारला दिसत नाहीत का ? का माहाराष्ट्रातला शेतकरी हा शेतकरी नाही का ? की मोदि का परिवारमध्ये माहाराष्ट्रातील शेतकरी येत नाहीत असा सवाल आ. रोहित पवार यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना विचारला आहे.
तर भाजपावाले आणि भाजपा सोबत गेलेले विकास वाले यावर तोंड उघडणार का आणि केंद्र सरकारला याचा जाब विचारणार का असा सवाल कांदा निर्याती संदर्भाने आ रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
केंद्र सरकारच्या वतीने कांदा निर्यात बंदी आहे त्यामुळे कांद्याचे भाव पडलेले असताना केंद्र सरकारच्या वतीने गुजरातच्या पांढऱ्या कांद्याच्या दोन हजार मेट्रिक टन निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये असंतोष व्यक्त केला जात आहे.
