December 7, 2025

पदाधिकारी तुपाशी… सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र उपाशी.

politics

बारामती : निवडणुका लागल्या की आपल्या भागतीत प्रचाराची पत्रके वाटण्यापासून नेत्यांच्या सभांना गर्दी जमविण्यापर्यंत आणि मतदारांना घराबाहेर काढून मतदान केंद्रापर्यंत त्यानंतर मतदारांचा कल कुणाच्या बाजूने आहे याची अलगत चपळाईने माहिती संकलीत करण्यापर्यंतची एनना अनेक कामे राजकीय पक्षांचा मुख्य काना असलेल्या तळागाळातील कार्यकर्त्यांच्या खांद्यावर असते. मात्र बारामतीत याच्या विरुद्ध आवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. इथे पक्षाचे पदाधिकारी तुपाशी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता मात्र उपाशी असल्याची खंत एका भाजपाच्या कार्यकर्त्याने बोलून दाखविली.

सध्या सोशल मीडियामुळे निवडणूक प्रचाराचा ट्रेण्ड बदलला असला तरी त्यासाठी कार्यकर्ता महत्वाचा असतो, सध्या सोशल मिडीयाच्या जमान्यात जगाच्या पाठीवर सोशल मीडियाचा धुमाकूळ सुरू आहे, जरी निवडणूक जिंकण्याची रणनीती बदलती असली तरी, पक्षीय कार्यकर्ता आजही पारंपरिक पध्दतीनेच काम करताना दिसतो आहे. बारामती शहरात प्रचार करताना शहरातील कार्यकर्त्याला डावलून ग्रामीण भागातील नागरिकांना तसेच वेगवेगळ्या कारखान्यात काम करणाऱ्या नोकरदार वर्गाला प्रचारासाठी बोलाविले जात आहे. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम तयार होताना दिसत आहे तसेच अनेक ठिकाणी उपाशी राबणाऱ्या कार्यकर्त्याकडे पाहण्यासाठी या राष्ट्रीय पक्षाच्या पदाधिकारी यांना वेळच नाही बारामतीत निवडणुकीच्या काळात प्रमुख पदाधिकारी तुपाशी आणि सर्वसामान्य कार्यकर्ते मात्र उपाशी अशी खंत कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.

कार्यकर्त्याची कुचंबना

बारामतीत महाविकास आघाडी मित्र पक्षाच्या उमेदवार असल्याने भाजपासह  राष्ट्रवादीच्या आणि मित्रपक्षाच्या वतीने प्रचारासाठी आयात केलेल्या प्रचारार्थी यांच्यामुळे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या हाडाच्या कार्यकर्त्याची मात्र कुचंबना होताना दिसत आहे.

कोणता झेंडा घेवू हाती… कार्यकर्त्याची डगमगलेली अवस्था

बारामतीत आधीच पक्ष फुटीमुळे गोंधळात पडलेली कार्यकर्त्याची मन:स्थिती आणि त्यातच त्यांना डावलून प्रचारासाठी आयात प्रचार्थी आणल्याने मुख्य कार्यकर्त्याची मानसिकता डगमगलेली असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे कोणता झेंडा घेवू हाती अशी स्थिती झाली आहे.

कमवायच्या दिवसात पदाधिकारी तुपाशी…..घडलेला किस्सा

उमेदवारी अर्ज भरताना महाविकास आघाडीच्या सर्वच मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांना पुण्याला जायचे होते शहरातील कार्यकर्त्यांना मिन्न्तवारी केल्यानंतर पाच गाड्या त्यांच्याच पदाधिकारी यांनी दिल्या मात्र त्याला दिवसभर उपाशी राहायची वेळ आली, सकाळी लवकर गेलेला कार्यकर्ता दिवसभर उपाशी राहिल्यानंतर आता नकोरे बाबा त्यांच काम अशी मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे.

घटकपक्षाच्या पदाधिकारी यांनी घेतले वाहत्या गंगेत हात धवून

नावाला पादाधीकारी यांनी प्रचाराला यायचे मात्र तुमचे कार्यकर्ते नको अशी देखील चर्चा आहे, कारण घटकपक्षाच्या पदाधिकारी यांनी वाहत्या गंगेत हात धवून घेतले आहेत अशी चर्चा नागरिक आणि कार्यकर्ते यांच्यात सुरु आहे.

ज्यांनी संघटना वाढीसाठी काम केले नाही,  ते मलिदा घेण्यात पुढे

तर शहरातील प्रचार तालुक्याची लोकं करत असल्याने आधीच नाराज कार्यकर्ते त्यात ज्यांनी संघटना वाढीसाठी काम केले नाही ते मलिदा घेण्यात पुढे आहेत अशी देखील चर्चा शहरात सुरु आहे. तर एकीकडे एक नंबरच्या राष्ट्रीय पक्षाच्या व्यक्तीला पंतप्रधान करण्यासाठी मतदान करा अशी जाहिरात होत आहे आणि तिथेच त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी मात्र “ मन की बात ” च्या एवजी “ धनकी बात ” करण्यात मग्न आहेत की काय ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!