उद्धव ठाकरे तुम्ही भाजपाशी गद्दारी केली.. खा रामदास आठवले
बारामती : संजय राउत उलट सुलट भाषा वापरतात महाराष्ट्राचे राजकारण कुठ नेहून ठेवले आहे सांगा असा सवाल उपस्थित करीत, महारष्ट्राच्या राजकारणाला काही नितीमत्ता आहे की नाही, उद्धव ठाकरे तुम्ही सांगा ? आम्ही कोणाला फोडलेलं नाही, तुम्ही सांगताय हे गद्दार आहेत, मात्र तुम्ही त्यावेळी गद्दारी केली माझा उद्धव ठाकरे यांना सवाल आहे की तुम्ही भाजपा आरपीआय यांना सोडून कॉंग्रेस राष्ट्रवादी सोबत गेला तेव्हा ती गद्दारी नव्हती का ? तुम्ही आगोदर गद्दारी केल्याचा आरोप खा. रामदास आठवले यांनी शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर केला.
सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ बारामतीत आरपीआयच्या वतीने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी आठवले बोलत होते यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, आरपीआयचे सुर्यकांत वाघमारे, विक्रम शेलार, रविंद्र सोनावणे, सुनील शिंदे, अभिजित कांबळे, भाजपाचे सचिन साबळे, माजी गटनेते सचिन सातव, माजी नगरध्यक्ष सुभाष सोमाणी. आदी उपस्थित होते.
पुढे आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे तुम्ही मुख्यमंत्री पदाच्या हव्यासाठी तुम्ही गद्दारी केली. आदित्य ठाकरे अद्याप लहान आहे, त्याला तुम्हांला मुख्यमंत्री कराण्याचा बालिशपणा करायचा आहे, तुम्हांला बहुमत मिळाल्यास करा, मात्र एवढ्या लवकर आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करणं म्हणजे बालिश पणा नाही का ? महाराष्ट्राचे राजकारण तुम्हांला कुठे नेहून ठेवायचे आहे. तुम्ही भाजपाच्या पाठीत खंजीर खुपसले आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती भीमशक्तीची मोट बांधली होती आपण चागले मित्र होतो मात्र तुम्ही गद्दारी केली. तुम्ही आमच्या सोबत राहिला असता तर तुमचे धन्याष्य बाण कोणीच हिरावून घेवू शकत नव्हते तुम्हीं घात केला म्हणून तुमच्याकडून धनुष्यबाण गेले आहे. असा आरोप उद्धव ठाकरे यांच्यावर आठवले यांनी केला
हम तो नही करते है बाते …बडी – बडी, लेकीन ,..चुनकर आनेवाली है सुनेत्रा पवार की घडी.
बरीच वर्षे मी होतो शरद पवार यांचा साथी पण आता आहे अजितदादांचा साथी नरेंद्र मोदी यांनी देशात वाढविली आहे विकासाची गती, म्हणूनच बारामतीत विजयी होणार आहे महा युती. लढाई आहे पवार विरुध्द पवार, पण आमच्या वाहिनीच होणार आहेत लोकसभेवर सवार. बारामतीची जनता राहिली नाही गवार, म्हणूनच बारामतीचा किल्ला सर करणार आहेत अजित पवार. अशी शेरो शायरी करीत
नरेंद्र मोदी यांना आडविण्याची ताकत राहुल गांधी यांच्यात नाही.
मी काही वर्षे कॉंग्रेस पक्षा सोबत राहिलो, शरद पवारांच्या आशीर्वादाने मला राज्यसरकारच्या मंत्रीमंडळात काम करण्याची संधी मिळाली, शरद पवारांमुळे मला मंत्रीमंडळात संधी पण आता आली आहे नरेंद्र मोदींची आंधी, नरेंद्र मोदी यांची विकासाची घोडदौड सुरु आहे त्यांचा विकासाचा घोडा अडविन्यासाठी इंडिया आघाडी थांबविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र आम्ही महायुतीचे लोकं त्यांच्या संरक्षणासाठी उभे आहोत. नरेंद्र मोदी यांना आडविण्याची ताकत राहुल गांधी यांच्यात नाही अश्या शब्दात आठवले यांनी राहुल गांधी यांची खिल्ली उडविली.
भ्रष्टाचार करत-करत कॉंग्रेस पुढे जात होती.
इंदिरा गांधी यांच्या काळात गरिबी हटावचा नारा दिला पण गरिबी हटविण्यात त्याच्या सरकारला यश आले नाही. 60-70 वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉंग्रेसला जमलं नाही. भ्रष्टाचार करत-करत कॉंग्रेस पुढे जात होती.असा आरोप कॉंग्रेसवर केला.
मित्र पक्षाने आम्हांला एकही जागा दिली नाही
मी सत्तेसाठी कुणाच्याही मागे जात नाही मात्र माझ्यवर आरोप होतो की जिकडे सत्ता असते तिकडे मी जातो. मात्र तसं नाही मी जिकडे जातो तिकडे सत्ता असते. माझा पक्ष सर्व देशभर असताना मित्र पक्षाला आम्ही एक जागा मागत होतो मात्र मित्र पक्षाने आम्हांला एकही जागा दिली नाही. अशी खंत आठवले यांनी व्यक्त केली.
माझा व माझ्या समाजाचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अपमान केला.
सन २००९ च्या निवडणुकीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने मी शिर्डी येथून निवडणुकीला उभे राहिल्या नंतर मला निवडणुकीत हरविले मी तीनवेळा निवडून आलो तरी देखील मी राहत असलेल्या बंगल्यातून त्याचे कुलूप काढून माझे सामान बाहेर काढले, बाबासाहेबांच्या, बुद्धांच्या प्रतिमा, फोटो माझे कपडे बाहेर काढले बंगला खाली केला. त्यामुळे मी प्रतिज्ञा केली की कॉंग्रेसला सत्तेतून बाहेर काढल्याशिवाय गप्प बसणार नाही. माझा व माझ्या समाजाचा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीने अपमान केला. कॉंग्रसच्या काळात विचार करून निर्णय होत नव्हते मला कधीही विचारात घेतले नाही. असाही आरोप कॉंग्रेसवर केला.
