अजित दादांनी सांगितली, पवार कुटुंबाची दूरदृष्टी.
बारामती : काल सभेत एक फोटो व्हायरल झाला. साहेब वर बसले होते आणि त्यांच्या पायाजवळ सुप्रिया बसली होती. एका बाजूला रोहित आणि एका बाजूला युगेंद्र बसले होते. का..? तर दाखवायला पवार कुटुंब किती एक आहे ? का ? तर आतिशय दूरचीदृष्टी का तर? अमेरिकेतील पत्रकार तिथं आले होते. अमेरिकेत जाव की बघा हे कुटुंब किती एक आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अप्रत्यक्ष कौटुंबिक दुरदुष्टी कशी आहे हे सांगितले.
महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा प्रारंभ बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरात नारळ फोडून करण्यात आला. यावेळी उपस्थित त्यांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. पुढे अजित पवार म्हणाले की, काल माझ्यावर येथे झालेल्या सभेत आरोप करण्यात आले. आरोप केल्याने माझ्या अंगाला भोके पडत नाहीत. सर्व संस्था साहेबांनी काढल्या असे त्यांचे म्हणणे आहे मग मी काय केले ? असा सवाल उपस्थित करीत सर्व संस्था त्यांनी काढल्या असे म्हणणाराचा जन्म तरी झाला होता का ? अश्या शब्दात आमदार रोहित पवार यांचा समाचार घेतला. तर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान वगळता इतर कोणतीही संस्था शरद पवारांनी काढली नसल्याचे सांगितले. ‘विद्या प्रतिष्ठान शरद पवारांनी काढली. कृषी विकास प्रतिष्ठान आप्पासाहेब पवारांनी काढली. छत्रपती कारखाना जाचकांनी काढला. माळेगाव कारखाना शेंबेकर यांनी सुरू केला. सोमेश्वर कारखाना काकडेंनी सुरू केला. या सगळ्या संस्था सुरू झाल्या तेव्हा हे ( रोहित पवार ) जन्मलेही नव्हते. यांना जन्माच्या आधीच कसं कळलं, असा टोला अजित पवारांनी लगावला.
यावेळी अजित पवार यांनी रोहित पवारांचा जिल्हा परिषद सदस्य ते आमदारकीपर्यंतच्या प्रवासातील कुटुंबात घडलेला किस्सा अजित पवारांनी जाहीर सभेत सांगितला. ‘रोहित पवारांना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत उभे राहायचे होते. मी पवार साहेबांच्या कानावर ही गोष्ट घातली. मात्र तेव्हा पवार साहेबांनी ठामपणे नाही म्हणून सांगितले होते. कारखानदारी बघण्याचा सल्ला साहेबांनी दिला. त्यानंतर त्यावर एक कुणकुण लागली की राजेंद्र पवार यांनी अपक्ष फॉर्म आणला असल्याचे लक्षात आले. त्यावरून मी साहेबांचेही न ऐकता मी रोहितला एबी फॉर्म दिला आणि जिल्हा परिषदेची उमेदवारी दिली,’ असेही अजित पवारांनी सांगितले. रोहित पवारांना हडपसरमध्ये विधानसभेसाठी निवडणूक लढवायची होती एकाच कुटुंबातील दोघेजण एकाच जिल्ह्यातून उभे राहिल्यास राज्यात वेगळा संदेश जाईल असे मी रोहितला सांगितले. मात्र तो आमदारकी लढवण्यावर ठाम होता. नंतर त्याला कर्जत जामखेडची उमेदवारी दिली, हे देखील अजित पवारांनी सभेत सांगितले
आम्ही धमकवत नाही, कोण धमकवतंय ? बघा..
अजित पवारांनी भाषणादरम्यान एक चिठ्ठी जाहीर सभेत हात उंचावून वाचून दाखवली. सुवर्णा दत्तात्रय पवार या शारदानगर संस्थेत काम करणाऱ्या महिलेला तिचा मुलगा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काम करतो, म्हणून कामावरून काढून टाकले आहे, असे अजित पवार यांनी वाचून दाखवले. अजित पवार यांनी सांगितले की, आमच्यावर धमकावण्याचा आरोप होतो, जर आम्ही धमकावले असते, तर मला एवढी मते पडली असती का ? मात्र खरे कोण धमकवतात ते पहा अशी चिट्टी उंचावत सांगितले.
अजित पवारांवर रोहित पवारांचे ट्वीट
दरम्यान मा. अजितदादा तुम्हांला राजकारणात ज्यांनी सेट केलं, सगळं काही दिले, त्या पवार साहेबांना सोडल्यानंतर त्यांच्यावर टीका करण्यासाठी तुम्ही चिटर, खंडणीखोर, धमकी देणारा आणि जेलवारी करून आलेल्या गुंड “अ” मंगलदास बांदल यांची मदत घेता आणि स्वतः मात्र मान खाली घालून शांत बसता हाच का तुमचा स्वाभिमान ? साहेबांवर टीका करण्यासाठी भाडोत्री लोकांचा वापर करण्याच तुमचं हे राजकारण कुणालाच पटणार नाही तुमच्यात झालेला हा बदल समजण्यापलीकडचा आहे असे ट्वीट समाजमाध्यमात आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

