बारामतीतील केबल ऑपरेटर यांचा अजित पवार गटाला पाठींबा
बारामती : बारामती शहर व ग्रामीण भागातील केबल ऑपरेटर यांनी एकत्र येत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या निवास्थानी भेट घेत पाठींबा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांचे निवडणुकीत काम करणार असल्याचे जाहीर केल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून संघटनेच्या वतीने पत्र देण्यात आले.
बारामतीकरांच्या मनात गैरसमज होऊ नये म्हणून आम्ही पाठिंबाचे पत्र दिले असून पहिल्यापासून अजित पवार यांना साथ देत आलोय इथून पुढे बारामतीच्या विकासाला साथ देणार असल्याचे तसेच अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार अशी ग्वाही सर्वांनी दिली प्रत्येक ऑपरेटर आपापल्या भागात केबल व इंटरनेट ग्राहकांच्या घरी जाऊन प्रचार करणार असल्याचे सांगितले, यावेळी शहराध्यक्ष जय बेलदार, मा.पंचायत समिती सभापती संजय भोसले आदी उपस्थित होते तसेच केबल ऑपरेटर प्रकाश रत्नपारखी, नरेंद्र मिसाळ, श्रीकांत जाधव, महेश गायकवाड, किसन पिल्ले, प्रफुल्ल जराड, महादेव सूर्यवंशी, भरत यादव, गणेश उबाळे, अशोक बेलकुते, लक्ष्मण पाटील, संतोष पाटणे, नामदेव सोलंकर, विनोद शिंदे, उपाल मिसाळ, हनुमंत सुरवसे, पप्पू जगताप, अमित शिंदे, सागर जाधव आदी तसेच शहर व ग्रामीण भागातील ऑपरेटर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एक दोन केबल ऑपरेटर म्हणजे संघटना नाही
यावेळी बारामतीत एक दोन केबल ऑपरेटर यांची भूमिका नेहमी वेगळी असते त्या भूमिकेशी संघटना सहमत असेलच असे नाही, म्हणून आम्ही पाठिंब्याचे पत्र देत असल्याचे उपस्थित ऑपरेटर यांनी बोलताना सांगितले.
