October 24, 2025

तुम्ही वय काढू नका.. तुम्ही अजून काय पाहिलंय.. हा गडी थांबणारा नाही… शरद पवार

435117671_1037905777698174_8120958703531784122_n

बारामती :  ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर त्यांच्या वयावरून अनेकदा टिप्पणी केली जाते. यावर शरद पवार यांनी मिश्किल टिप्पणी करत पवार म्हणाले की, अनेक जण ८४, ८५ वय झाले असे म्हणतात. तुम्ही वय काढू नका.. तुम्ही अजून काय पाहिलंय.. हा गडी थांबणारा नाही.. ज्या लोकांनी साथ दिली. त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कामे करत राहणार असा निर्धार व्यक्त केला.

शरद पवार हे बारामती तालुक्याच्या दुष्काळी दौऱ्यावर होते तालुक्यातील उंडवडी येथे त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले त्यावेळी पवार बोलत होते यावेळी माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव त्यांच्यासोबत होते

दबावाला घाबरू नका मी तुमच्या मागे आहे

घड्याळाला मतदान केले नाही तर पाणी मिळणार नाहीकारखान्याला ऊस जाणार नाहीया आशयाची चिठ्ठी शरद पवार यांना दिली त्यावर. शरद पवार यांनी ही चिठ्ठी जाहीर सभेत वाचून दाखवली आणि अशा धमक्यांना घाबरू नका, मी तुमच्या मागे उभा आहे, कोणी काही करू शकत नाही, जे दम देतात जे दबाव आणतात त्यांना माहिती नाही की त्यांना त्या जागेवर कोणी बसविले आहे  अश्या शब्दात जेष्ठ नेते शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता त्यांचा समाचार घेतला. 

मोदींच्या हातातील सत्तेची सुटका करायची आहे.  

मोदी प्रधानमंत्री झाले, त्याच्याआधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्यांच्या गुजरात राज्याला मी कृषी मंत्री असताना प्रचंड मदत केली. मी असं बघितलं नाही ते कोणत्या पक्षाचे आहेत ?  मी हे बघितलं की ते एका राज्याचे मुख्यमंत्री आहेत,  त्या राज्याचा शेतकरी जर सुखी करायचा असेल तर राज्याला मदत केली पाहिजे, हे धोरण त्यांनी स्वीकारावं असा आग्रह केला. त्यांनी स्वीकारलं आणि मी मदत केली. पंतप्रधांनी बारामतीला आल्यानंतर त्यांनी भाषण केलं की मी जे काही घडवलं त्याचं महत्त्वाचं कारण हे माझं बोट धरून मला पवार साहेबांनी शिकवलं,  मात्र देशाच्या प्रधानमंत्र्यांनी. आज तेच प्रधानमंत्री वेगळी भूमिका घ्यायला लागले आहेत. व्यक्तीगत टिका, त्यांच्या राजकारणामध्ये वेगळ्या विचाराला कुणी भूमिका घेतली तर त्याच्यावर कारवाई आणि ती कारवाई किती करायची, कुणावर करायची. ही हुकूमशाही आवरली गेली नाही तर देशाचे चित्र बदलेल आणि सत्ता ही मूठभर लोकांच्या हातामध्ये जाईल, सत्ता ही अधिक लोकांच्या हातात जायला पाहिजे. सत्ता एखाद्या व्यक्तीच्या हातात जाते तर ती भ्रष्ट होते,  चुकीच्या मार्गाला जाते. सत्ता अधिक लोकांच्या हातामध्ये असली तर ती चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही. आज ही सत्ता केंद्रित झाली. मोदींच्या हातामध्ये आणि त्यामधून आपल्याला सुटका करायची आहे असे आवाहन पवारांनी केले.

राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी इथे मत मागायला येणार का ?

काही लोक सांगतात की,  ही निवडणूक स्थानिक नाही. ही मोदी आणि राहुल गांधी यांच्यात आहे.  बारामती लोकसभेला काय राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी इथे मत मागायला येणार का ? असा सवाल उपस्थित करीत काही लोक सांगतात मोदींना प्रधानमंत्री करण्यासाठी मत द्या. आता हे एक नवीन निघालं आहे. महाराष्ट्राचं सांगत नाहीत, महाराष्ट्रासाठी सत्ता पाहिजे त्यासाठी मत द्या हे सांगत नाहीत. ते सांगतात राहुल गांधी की मोदी ?  माझ्या दृष्टीने हा निवडणुकीचा प्रश्न स्थानिक आणि इथल्या स्थानिक जनतेच्या मताच्या सामुदायिक शक्तीच्या जोरावर देश पातळीवर योग्य काम कसं होईल ?  हे बघणाऱ्यांची ही लढत आहे. असे प्रति उत्तर देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता दिले.

जे गेले ते गेले ?

 दुर्दैवाने या वेळेला उमेदवार घरातलेच आहेत त्याचं काही कारण नव्हतं काही लोक गेले, पक्ष सोडला आता हा इतिहास मी काही सांगायची गरज नाही. मी तुम्हाला प्रश्न विचारतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला ?  सबंध देशाला माहित आहे. आतापर्यंत जे लोक निवडून आले ते कोणी निवडून आणले ?  ज्यांना मंत्री पद दिली ती कोणी दिली ?  मी कधी स्वतःला मागितली नाही,  काही गरज नव्हती. आपण नवीन कार्यकर्ते तयार करणं, त्यांना प्रोत्साहन देणं, त्यांच्यामार्फत विकासाचं काम करून घेणं हाच माझा स्वभाव आहे. गेल्या १०-२० वर्षांमध्ये मी स्थानिक राजकारणात लक्ष दिलं नाही. मी कधी असं म्हटलं नाही की पंचायत समितीला याला तिकीट द्या, माळेगाव कारखान्याला याला डायरेक्टर करा, नगरपालिकेमध्ये याला नगरसेवक करा,  नव्या पिढीच्या हातात घ्या, चांगलं काम करा, अडचण आली तर सल्ला घ्या आणि योग्य ते काम सर्वजण मिळून करा मात्र काही लोकांनी टोकाची भूमिका घेतली. ज्यांनी टोकाची भूमिका घेतली ते कोणामुळे गेले ? असा सवाल उपस्थित केला.

भाजपासोबत जाण्यासाठी बारामती करांनी मत दिली नव्हती.

भाजप हा पक्ष सर्वसामान्य खेड्यापाड्यातील लोकांच्या हिताची जपणूक करणारा पक्ष नाही. हा मूठभर लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर जाणं याच्यासाठी बारामतीकरांनी मतं दिली नव्हती. मागची निवडणूक इथे विधानसभेची झाली तुम्ही शंभर टक्के मतदान केले,  ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नावाने केले. आम्ही हे विसरतोय आणि भलतीकडे जातो. माझ्या मते हा चुकीचा रस्ता आहे, तो थांबला पाहिजे असे व्यक्त करीत लोक योग्य रस्त्यावर आणले पाहिजेत त्या दृष्टीने हि निवडणूक महत्त्वाची असल्याचे पवारांनी व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!