प्रा.रमेश मोरे यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त

बारामती : लोकराजा शाहू छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट इचलकरंजी, जि. कोल्हापूर या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या शाहू महोत्सवात तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील प्रा. रमेश मोरे यांना आदर्श शिक्षक राज्यस्तरीय लोकराजा शाहू पुरस्कार खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
प्रा. मोरे हे तुळजाराम चतुरचंद कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गेल्या १५ वर्षांपासून मराठी विभागामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी २००२-०७ या काळात त्यांनी बारामती नागपरिषदेचे नगरसेवक म्हणून काम केले आहे. महापुरुषांच्या विचारांचा जागर करण्यासाठी ते विविध ठिकाणी व्याख्याने देत असतात. प्रा. रमेश मोरे याना प्राप्त झालेल्या पुरस्काराबद्दल अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शाह , सचिव मिलिंद शाह, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.