श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांना धरले धारेवर

बारामती : जेष्ठ नेते शरद पवार यांचे वय झाले आहे. म्हणून त्यांना सोडणे हे मला पटले नाही, मला काहींनी सांगितले यापुढचा काळ हा दादांचा आहे साहेबांचा नाही हा विचार मला वेदना देणारा आहे, तर पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करीत नाही यासारखा नालायक माणूस नाही अशा शब्दात अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवार पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समाचार घेतला.
पवारांच्या बारामतीत येथील काटेवाडी या गावात अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार भावजय शर्मिला पवार यानी आपण शरद पवार साहेबांच्या सोबत त्यांच्या बाजूने असणार असल्याची भूमिका जाहीर केली त्यावेळी आपण पवार बोलत होते. पुढे श्रीनिवास पवार म्हणाले की, तुम्हांला आश्चर्य वाटेल की, मी दादांच्या विरोधात कसा मात्र मी भाऊ म्हणून आजवर साथ दिली आहे, भाऊ म्हणून तुझं सगळ ऐकले मात्र आता नाही, साहेबांचे आमच्यावर असलेले उपकार सगळ्यांना माहित आहेत ज्या साहेबांनी मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले ? असे म्हणायचे असा काका मला असता तर मी खुश झालो असतो, आपण औषध विकत घेतो, त्याला एक्सपायरी डेट असते, तशी नात्याला एक्सपायरी डेट असते का ? असा सवाल उपस्थित केला
तर माझे हे रेकॉर्डिंग कोणाला पाठवायचे असेल तर ते पाठवा मी कोणाला घाबरत नाही मी कोणाकडे लाभार्थी म्हणून जाणार नाही वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका असा इशारा दिला. भाजपाने जेष्ठ नेते शरद पवार यांना संपविण्याचा अनेकदा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही आणि घरातील व्यक्ती फोडल्याशिवाय घर संपत नाही हा इतिहास आहे आणि एकत्र कुटुंब असेल तर त्याला कोणी संपवू शकत नाही असाही रोष व्यक्त केला.