बारामतीत डॉक्टरनेच केले परीचारीकेचे लैंगिक शोषण ….शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
बारामती : बारामतीतल्या एका नामांकित रुग्णालयात डॉक्टरनेच परीचारीकेचे लैंगिक शोषण केले असून झाल्या प्रकाराबाबत कोणास काही सांगितले तर जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
या प्रकरणी पिडीत परिचारिकेने बारामती शहर पोलिस ठाण्यात डॉ. प्रदीप शिंदे, देवकाते हॉस्पिटल बारामती यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून फिर्यादीमध्ये पीडित परिचारिकेला डॉक्टरने लग्नाचे आमिष दाखवून अनेकदा अतिप्रसंग केला तसेच लग्न करण्याची विचारणा केली असता डॉक्टरने पीडित परिचारिकेला त्याच्या घरात डांबून ठेवून तु जर का या बद्दल कोणास काही सांगितले तर जिवे मारून टाकण्याची धमकी दिल्याचे फिर्यादी मध्ये नमूद केले आहे.
