ॲड.सुधीर पाटसकर यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न

बारामती : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष ॲड . सुधीर पाटसकर यांच्या वाढदिवसानिमित्त, स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराच्या वतीने गरजु महिलांना साडी वाटप करण्यात आले.
नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण, स्वप्निल विष्णुपंत चव्हाण मित्र परिवाराचे स्वच्छता दुत अध्यक्ष चिऊशेठ जंजीरे, कार्यअध्यक्ष नरेंद्र मिसाळ, विठ्ठल आगवणे व नगरपालिका सुपरवायझर शुभम जाधव, बारामती शहर राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष गौरव आगवणे, गौतम थोरात, गणेश सुर्यवंशी, इतर मित्र परिवार मान्यवरांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी नगरपालिका स्वच्छता कर्मचारी यांना देखील साडी वाटप केल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले यावेळी उपस्थितांचे आभार सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण यांनी मानले