December 6, 2025

बारामती कराटे क्लबच्या सहा खेळूनची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत निवड

IMG-20240229-WA0046
बारामती  :  दि. 2 मार्च व 3 मार्च रोजी अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स,अंधेरी, मुंबई  येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्य कराटे स्पर्धेत बारामती शहरातील बारामती कराटे क्लबची सहा खेळाडूंची पुणे संघात निवड झाली आहे.
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हास्तरीय कॅडेट, ज्युनिअर, अंडर ट्वेंटी वन व सिनिअर कराटे स्पर्धेमध्ये बारामती शहरातील बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राज्यस्तरीय  कराटे स्पर्धेत पुणे जिल्हा कराटे संघात  1) चंदना संजय करडी  ( 47 किलो, अतिल, कॅडेट वयोगटात, कुमिते ),  2) मोहित तात्यासाहेब बेलदार  ( 57 किलो, अतिल, कॅडेट वयोगटात, कुमिते ), 3) मनोज संजय सुरवसे
( 55 किलो, अतिल, ज्युनिअर  वयोगटात, कुमिते ),  4)आदित्यराज नितीन झांबरे   ( 50 किलो अतिल, ज्युनिअर  वयोगटात, कुमिते ),  5) सावी विपुल शहा  ( 42 किलो, अतिल, ज्युनिअर  वयोगटात, कुमिते )  6) मंथन मिननाथ भोकरे  ( 67 किलो, अतिल, सिनिअर  वयोगटात, कुमिते व काता  )  या गटात पुणे संघात निवड झाली आहे. या सर्व खेळाडू  बारामती कराटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर मिननाथ रमेश भोकरे  यांच्याकडून कराटे प्रशिक्षण घेत आहेत.
error: Content is protected !!