पक्ष आणि चिन्ह काढून घेणे हा अन्याय… जेष्ठ नेते खा. शरद पवार

बारामती : असा निर्णय होईल याची खात्री होती, पक्ष आणि चिन्ह काढून घेणे हा अन्याय असून पदाचा गैर वापर करून हा निर्णय घेतला असल्याने आम्ही सुप्रीम कोर्टात दाद मागितली असल्याचे जेष्ठ नेते व खा शरद पवार यांनी मत व्यक्त केले. बारामती येथील गोविंद बाग येथे जेष्ठ नेते व खा. शरद पवार यांनी बोलताना मत व्यक्त केले.
पुढे पवार म्हाणाले की, ज्याने पक्षाची स्थापना केली, त्याच्याच कडून पक्ष काढून घेतला असे यापूर्वी कधी घडले नव्हते, मात्र पक्ष आणि चिन्ह गेल्याने अस्तित्व संपत नाही, पुन्हा नव्या जोमाने संघटना बांधणार असल्याचा निर्धार जेष्ठ नेते खा शरद पवार यांनी बोलून दाखविला. तर चिन्हाची फार चिंता करायची गरज नाही मी १४ वेळा निवडणूक लढलो आहे, त्यापैकी पाच निवडणूक चिन्ह हे बैलजोड, गायवासरू, चरखा, हाताचा पंजा, आणि घड्याळ अशी चिन्ह होती मात्र चिन्ह काढून घेतले म्हणजे संघटना संपली असे होत नाही.
मतदारांना भावनिक करण्याचा काही संबंध नाही, बारामती मतदार संघातले लोक आम्हांला वर्षानुवर्षे ओळखत आहेत, त्यामुळे कोणाला भावनिक करण्याचे काही कारण नाही मात्र ज्या पद्धतीने हे मतदारांच्या समोर मांडले जात आहे ते काहीतरी वेगळे आहे, तेव्हा त्याची नोंद समंजस मतदार घेतील असा खोचक टोला नाव न घेता अजित पवार यांना लगावला. तर लोकशाहीत निवडणुकीला उभे राहण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यासंबंधी तक्रार करण्याचे काहीच कारण नाही. तर गेली साठ वर्षे आम्ही काय केले हे लोकांना माहित आहे बारामतील संस्था कधी पासून आहेत, आणि जे आरोप करीत आहेत त्यांचे तेव्हा वय किती होते याचाही विचार करावा असेही जेष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केले.