बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या चित्र रथामुळे चर्चेला उधाण
बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार यांची अधिकृत घोषणा होणे आता बाकी आहे. बारामती शहरात सुनेत्रा पवार यांच्या कामाची माहिती देणारा प्रचार चित्ररथ फिरू लागल्यामुळे सुनेत्रा पवार याच आगामी बारामती लोकसभेच्या उमेदवार असणार हे जवळपास निश्चित असल्याची चर्चा बारामतीत सुरु झाली आहे.
बारामती लोकसभा मतदार संघात खा. सुप्रिया सुळे या विद्यमान खासदार आहेत मात्र पवार परीवारात दोन गट पडल्याने अजित पवार यांचा बारामती लोकसभेचा उमेदवार कोण ? याविषयी कमालीची उत्सुकता आहे मात्र हा चित्ररथ बारामतीत फिरू लागल्याने बारामतीत चर्चेला उधाण आले आहे.
