वरिष्टाच्या पोटी जन्माला आलो असतो, तर पक्ष माझ्या ताब्यात आला असता …. अजित पवार यांना प्रथमच अश्रू अनावर.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार छायाचित्र : स्वप्नील शिंदे
बारामती : तुम्ही अध्यक्ष झाला तर चांगल आणि आम्ही अध्यक्ष झालो तर आम्ही बेकार आम्ही पक्ष चोरला… अरे चोरला कुठला ? निवडणूक आयोगाने आम्हांला मान्यता दिली, विधानसभेच्या अध्यक्षांनी आम्हाला मान्यता दिली, तरी का बदनामी करता ? का चुकीचे सांगता ? आम्ही जर का वरिष्टाच्या पोटी जन्माला आलो असतो तर पक्ष माझ्या ताब्यात आला असता…. तुमच्या सख्या भावाच्याच पोटी मी जन्माला आलोना अश्या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता खा. शरद पवार आणि खा. सुप्रिया सुळे यांचा समाचार घेतला.
बारामतीत लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आयोजित केलेल्या बूथ कमिटी कार्यकर्ता मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.
पुढे पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भाजपासह सर्व घटक पक्षाचे एकमत झाले असून. केंद्रात ज्या पक्षाचे सरकार आहे त्याच पक्षाचा खासदार झाला तर सुरु असलेली विकास कामे मार्गी लागतील तसेच केंद्राच्या योजना आणता येतील त्यासाठीच मी माझा उमेदवार बारामती लोकभेसाठी उभा करणार आहे.
त्या पार्श्वभूमिवर जागा वाटपाचे धोरण लवकरच निश्चित होईल, त्यानंतरच बारामती लोकसभा मतदार संघात आमचा उमेदवार जाहीर होईल. उमेदवार हा अजित पवारच आहे, हा विचार करून जोमाने कामाला लागा, बारामतीचा विकास बघून मतदान करा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत केले.
लोकसभा किंवा विधान सभेची निवडणूक आपल्याला नविन नाहीत. मात्र यंदाच्या निवडणूकीत घड्याळ चिन्ह तेच…पण वेळ बदलली आहे, असे सांगून अजित पवार म्हणाले,“ देशाच्या लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व आहे. राष्ट्रवादी पक्ष कोणाचा हे निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी बहुमताचा विचार करून ठरविले आहे. त्यामध्ये आम्ही पक्ष चोरला आणि पळविला हे म्हणणे चुकीचे आहे. आमची बदनामी केली यांच्या चौकशी चालू झाल्या म्हणून त्यांनी असे केले, जो काम करतो त्यावरच आरोप होतात जो कामच करत नाही त्यांच्यावर कसा आरोप होईल असेही पवार यांनी व्यक्त केले.
पार्लमेंटमध्ये नुसते भाषण करून प्रश्न सुटत नाहीत…
बारामती लोकसभा मतदार संघात आमचे वरिष्ठ भावनिक करतील. भावनिक होऊन प्रश्न सुटत नाहीत. ते प्रश्न पुर्णत्वाला आणण्याची माझ्यात धमक आहे. काहींना वाटते की पार्लमेंटमध्ये भाषणे केली आणि संसदपट्टू म्हणून किताब मिळविला म्हणजे सर्वकाही केले मात्र असे नाही. त्यासाठी रात्रंदिवस काम करावे लागते. त्यांनी केवळ भाषण आणि सेल्फी काढण्यात वेळ घालविला. माझा उमेदावर मात्र नवखा असला तरी मी जुनाच आहे. त्यामुळे अजित पवार यांच्याकडे बघून मतदान कराचे.
मला एकटे पाडण्याचा प्रयत्न होईल… अजित पवार यांना अश्रु अनावर
या वेळ्ची लोकसभा निवडणूक माझ्या कुटुंबियांच्या दृष्टीने आव्हानात्मक आहे. मी व माझे कुटुंब वेगळे आणि कदाचित पवार कुटुंबियांमधील इतर लोक माझ्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक विकास कामांच्या मुद्यांवर मी जिंकण्याचा निर्धार केला आहे. त्याला तुम्ही साथ द्या, असे अजित पवार यांनी उपस्थितांना भावनिक आवाहन केले यावेळी अजित पवार यांना अश्रु अनावर झाले.
कडक स्वभावाचे दादा झाले भावनिक….
विरोधक भावनिक करतील असे म्हणत म्हणत खुद्द कडक स्वभावाचे अजित पवार स्वतः भाषण करीत असताना भावनिक झाले आणि त्यांना आश्रु अनावर झाल्याचे पाहिले मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी त्यांना धीर देत घोषणा दिल्या.