दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या,…….दोन पिकअप सह 12 लाख 96 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
बारामती : दरोडा टाकण्याचे तयारीत असलेला सराईत टोळीचा मोरक्या ताब्यात घेवुन एक गावठी पिस्टल, दरोडा टाळण्यासाठी लागणारे साहित्य तसेच दोन पिकअप वाहनासह १२,९६,१००/- किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे अन्वेशण शाखा व सुपा पोलीस स्टेशन कारवाई यांनी कारवाई करीत हस्तगत केला आहे.
दिनांक १० फेब्रुवारी रोजी सुपा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व पचक हे रात्र गस्तकामी रवाना झाले असताना रात्रगस्त दरम्यान त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सुपा पोलीस स्टेशन हद्दीत सुपे गावामध्ये एक पांढरे रंगाची होन्डा कंपनीची अमेझ चारचाकी गाडी सदरची संशयित होन्डा अमेझ कारला सासवड चौक सुपा येथे थांबविली असता त्या गाडीमध्ये चार पुरुष व एक महिला तोंडाला रुमाल बांधलेले दिसुन आले. सदर संशयित कारची तपासणी केल्यानंतर चालकांचे बाजूस असलेले शीटवरील इसमांस खाली उतरावुन विचारपुस करीत असताना कार मधील चालकाने एक लोखंडी ऍडजेस्टेबल पाना कार मधुन बाहेर टाकुन गाडी चालू करून मोरगावचे दिशेने पळून गेला. गाडीतुन उतरवलेले इसमांस त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव गणेश चंद्रभान गायकवाड रा. खांडगाव ता. संगमनेर जि. अहमदनगर असे असल्याचे सांगितले. त्याचे अंगझडती घेतली असता सदर इसमाचे कमरेस एक गावठी पिस्टल, पॅन्टचे खिशामध्ये एक मोबाईल प्लॅस्टीक पिशवीमध्ये मिरचीची पावडर मिळुन आली. तसेच गाडीतील इतर इसमाबाबत विचारपुस केली असता त्याने त्यांची नांवे १) अजित अरूण ठोसर २) गोविंद शिरसाठ ( दोन्ही रा.मातकुळी ता. आष्टी जि. बीड) ३) सिमा रावसाहेब गायकवाड ( रा.जालना ) ४) एक अजित ठोसर याचा मित्र नाव पत्ता माहित नाही असे असल्याचे सांगितले. ही सर्व टोळी दरोडा टाकण्याचे उद्देशाने तयारीने आले असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे विरुद्ध सुपा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला तपास करीत आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी सांगवी, बारामती, मिरजगांव, बेलवडी ( अहमदनगर ) फलटण इत्यादी ठिकाणी चारचाकी वाहने चोरल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपी याचेकडुन तपासात गावठी पिस्टल, मिरची पावडर, ऍडजेटेबल पाना, मोबाईल, पिकअप ( त्यातील दोन पिकअप सुस्थितीत २ पिकअपचे कट केलेले वेगवेगळे भाग ), गॅस पाईप सह वाहने कट करण्याचे ग्लॅन्डर, असा एकुण कि. रु १२,९६,१००/- रुपयाचा माल हस्तगत करण्यात आला असुन माळेगाव पोलीस स्टेशन, मिरजगाव पोलीस स्टेशन, बेलवडी पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असून फलटण, सटाणा इत्यादी ठिकाणी घटना केलेचे उपडकीस आले आहेत. आरोपीचे नावे गणेश चंद्रभान गायकवाड ( वय २३ वर्षे रा. खांडगाव ता. संगमनेर), अजित अरूण ठोसर ( रा. मातकुळी ता. आष्टी) अशी आहेत
सदरची कामगिरी सदर गुन्हयाचे तपास पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक बारामती विभाग संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर सुपा पोलीस स्टेशनचे सहा पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अमित सिद, पोलीस उपनिरीक्षक जिनेश कोळी, पोलीस अमंलदार बाळासाहेब कारंडे, रविराज कोकरे, अजय घुले, राहुल भाग्यवंत, रूपेश साळुके, संदिप लोंढे, महादेव साळुके, किसन ताडगे, निहाल वनवे होमगार्ड खोमणे,भोसले यांनी केली.
