मिननाथ भोकरे यांना अखिल भारतीय मास्टर कराटे स्पर्धेत दोन स्वर्ण पदके

पदक स्विकारताना शिहान मिननाथ भोकरे
बारामती : सिकोकाई कराटे असोसिएशन महाराष्ट्रचे सचिव व बारामती कराटे क्लबचें अध्यक्ष शिहान मिननाथ रमेश भोकरे यांना 3 आणि 4 फेब्रुवारी 2024 रोजी तालकटोरा इनडोअर स्टेडियम, दिल्ली येथे अखिल भारतीय मास्टर कराटे स्पर्धेत काता व कु्मिते भाग घेताना दोन्ही प्रकारात दोन स्वर्ण पदके मिळाली . तसेच या स्पर्धेत आपल्या बारामती कराटे क्लबचा वीरेन तावरे नऊ वर्षी वयोगटातील 25 किलो वजनगटात व मंथन भोकरे 21 वर्षी वयोगटातील 67 किलो वजनगटात यांनी हि दोन दोन कास्यपदक मिळविले. भारतातील 26 राज्यातील 789 स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. आपल्या श्रेणीत चमकदार कामगिरी करून महाराष्ट्र संघला 6 गोल्ड ,8 सिल्वर ,27 ब्रॉन्झ असें एकूण महाराष्ट्र संघला 41 पदके मिळावीत उत्कृष्ट संघाची ट्रॉफी महाराष्ट्र संघाला मिळवून दिली. या कामगिरीवर हंसी भरत शर्मा, कराटे इंडिया ऑर्गनायझेशनचें सचिव क्योशी संजीव जांगरा यांनी शिहान मिननाथ भोकरे यांच्यासह सर्व विजेत्यांचे अभिनंदन केले.