सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाईफेक
बारामती :बारामती तालुक्यातील मौजे काऱ्हाटी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर अज्ञातांनी शाईफेक केल्याची घटना बारामतीतच घडली आहे. दरम्यान शाई फेकल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी फलक उतरविला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या फोटोचा तसेच भावी खासदार अशा आशयाचा एक बॅनर का-हाटी या गावात लावण्यात आला होता. त्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीने शाई टाकली आहे. ही बाब ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पोलिसांना या बाबत माहिती दिली. मात्र झालेल्या घटनेने अनेक चर्चेला उधान आले असून या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान खा. सुप्रिया सुळे या बारामती दौऱ्यावर होत्या या घटनेबाबत त्यांच्याशी पत्रकारांनी बोलले असता त्यांनी घटनेची चौकशी झाली पाहिजे तसेच शाही फेकणे हे कृत्य आतिशय चुकीचे असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
