शारदानगरमध्ये औषधीवनस्पती व जीव विज्ञानातील संशोधनावर राष्ट्रीय परिषद संपन्न
बारामती : राष्ट्रीय औषधी वनस्पतीमंडळ, आयूषमंत्रालय, भारत सरकार,पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व शारदाबाई पवार महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न झाली. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त सचिव सुनंदा पवार, कार्यकारी अधिकारी निलेश नलावडे, मानवी संसाधन प्रमुख गार्गी दत्ता व परिषदेचे सह निमंत्रक प्राचार्य डॉ. एस. व्ही. महामुनी व डॉ. दिगंबर मोकाट, यांच्या मार्गदर्शनाखाली या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे माजी कुलगुरू डॉ. एस. एस. मगर, यांच्या हस्ते झाले. यावेळी आयुर्वेदिकड्रग मॅन्युफ्चरर्स असोसिएशन मुंबईचे संचालक मुलराज वडोर यांची प्रमुख उपस्थिती होती.
या परिषदेत डॉ.दत्तात्रय नाईक (पुणे), डॉ. एस. के. दास (भुवनेश्वर), डॉ. अरविंद धाबे (संभाजीनगर), डॉ.प्रकाश इटणकर (नागपूर), डॉ. के. एस.लड्डा. (मुंबई), डॉ. दिगंबर मोकाट (पुणे), डॉ. बिना इनामदार(कन्याकुमारी), डॉ. संगोराम अपूर्वा (पुणे) या संशोधक शास्त्रज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केले. या परिषदेमध्ये सुंगधी वनस्पती व त्याचे नॅनो सायन्स व जैवतंत्रज्ञान व त्यांचे उपयोग, जैवविविधता, औषधी व सुंगधी वनस्पती मार्केटिंग व मुल्यसंवर्धन इ. विषयावर संशोधकामध्ये विचार विनिमय चर्चा व मार्गदर्शन झाले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी शेतक-यासाठी अश्वगंधा व इतर प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्यावनस्पतीच्या शेती संदर्भात कार्यशाळेचे आयोजन केले गेले.पश्चिमविभागीय औषधीवनस्पती सुविधा केंद्रांचे विभागीय संचालक प्रो. डॉ. दिगंबर मोकाट यांनी शेतक-यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने औषधीवनस्पती संबधित निबंध, पेंटीग, ड्राईंग व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे मुल्यांकन प्रो.डॉ. आडे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ,वनस्पतीशास्त्र विभाग,डॉ. दत्तात्रय नाईक मॉर्डन कॉलेज पुणे व प्रा. लोहकरे लायब्ररीयन, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय शारदानगर यांनी केले.
निबंध स्पर्धेत पहिले परितोषिक कु. प्रतीक्षा प्रभाकर शेकडे, रिसर्चस्कॉलर डिपार्टमेंट ऑफ बॉटनी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संभाजीनगर तसेच निबंध स्पर्धेत कु. कांदबरी सावंत, एस. वाय. बी. फॉर्मची विद्यार्थीनी सीताबाई थिटे महाविद्यालय यांना दुसरे पारितोषिक मिळाले. पेंटीग स्पर्धेत पहिले बक्षिस कु. वैष्णवी देवकर एफ. वाय. बी. व्होक, शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर व तन्विराजे अमर भोसले दादापाटील महाविद्यालय कर्जत यांना दुसरे बक्षिस मिळाले. फोटोग्राफी या स्पर्धेचे पहिले बक्षिस कु. अक्षता कुदळे बाबुरावजी घोलप कॉलेज सांगवी पुणे व दुसरे बक्षिस कु. वैष्णवी राजपुरे एफ. वाय. बी. व्होक. शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर यांना मिळाले. वक्तृत्व स्पर्धेत कु. हर्षदा राजेंद्र कदम एफ. वाय. बी. एस्सी. शारदाबाई पवार महिला महाविद्यालय, शारदानगर यांना पारितोषिक मिळाले. वनस्पती संवर्धन व पुनरुत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती यामध्ये संकेत रौंधल पुणे व दिलीपभाई राठोड वडोदरा, गुजरात यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. अश्वगंधा कार्यशाळेत उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांपैकी अशोक तावरे माळेगाव, नितीन तावरे सांगवी, प्रल्हाद वरे मळद, तांबे गुणवडी व डॉ. संतोष गोडसे केव्हीके बारामती यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
या परिषदेत संशोधन पत्रिकांच्या ओरल प्रेझेंटेशनचे पहिले परितोषिक श्रीधर ओतारी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, दुसरे परितोषिक रोहन गव्हाणकर व्हिवा कॉलेज विरार, मुंबई व तिसरे परितोषिक अक्षय गुळवे, टि. सी. कॉलेज बारामती यांना मिळाले व पोस्टर प्रेझेंटेशनचे पहिले परितोषिक कु. आरती सुतार, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सातारा व जास्मीन सैय्यद टी. सी. कॉलेज बारामती यांना दुसरे परितोषिकमिळाले. सर्व विजेत्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या परिषदेसाठी तामिळनाडू, कर्नाटक, छत्तीसगड, महाराष्ट्र इत्यादी राज्यांमधील २०० हून अधिक शास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थी, विद्यार्थीनी सहभागी झाले होते, असे परिषदेच्या संयोजक सचिव प्रो.डॉ. बबिता सकदेव व समन्वयक प्रा. राजकुमार देशमुख यांनी सांगितले.
या परिषदेच्या आयोजनात आयक्यूएसचे प्रमुख डॉ. मराठे, कला वाणिज्य शाखा प्रमुख डॉ.निंबाळकर, विज्ञान शाखा प्रमुख डॉ.जाधव,वनस्पतीशास्त्र विभागातील सहकारी डॉ.सोनवणे, प्रा.भगत, डॉ.निकुळे, प्रा.पवार, प्रा.कासार, पुणे विद्यापीठ आर सी एफ सीचे डॉ. खरात, फुंदे, कार्यालयीन सहकारी गायकवाड, कोकरे व प्रयोगशाळा सहकारी डावखर, जाधव, वाबळे, गव्हाणे, बंडगर, रणदिवे, खराडे, गवारे यांचे सहकार्य लाभले.
