February 11, 2026

श्री.गणेश सेवा केंद्र संचलित पेट्रोल पंपाच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न

IMG-20240209-WA0052
बारामती : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लि.संचलित श्री.गणेश सेवा केंद्र पेट्रोल पंप मोरगाव ‘च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरात यावेळी 51 रक्तदाते यांनी उत्फूर्तपणे रक्तदान केले.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांच्या हस्ते तसेच जिल्हा परिषदेचे सदस्य भरत खैरे,सेंट्रल बँकेचे प्रबंधक पाचांगे, चांदगुडेवाडीचे सरपंच अशोक खैरे, भोंडवेवाडीचे उपसरपंच सागर भोंडवे, सद्स्य विनोद सस्ते, व धिरज भोंडवे, यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले या वेळी शिबिर आयोजक सौ. शैला काळूराम खैरे, किरण खैरे, केतन खैरे आदी उपस्थित होते.
शिबिर यशस्वी करण्यासाठी सुरेश भोंडवे, तुषार बोरकर, धीरज भोंडवे, चरण खैरे, वैभव खैरे, यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!