October 24, 2025

शारदानगर महिला महाविद्यालयात सोशल मिडिया ॲण्ड मेंटल हेल्थवर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन.

Picsart_24-02-06_17-17-11-998
बारामती : शारदानगर महिला महाविद्यालय बारामती येथे सोशल मीडिया ॲण्ड मेंटल हेल्थ या विषयावर दोन दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे दि १६ व १७ फेब्रुवारी रोजी शारदाबाई पवार महिला महाविद्यालयात मानसशास्त्र विभागाने आयोजन केले आहे.
संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार, विश्वस्त व सचिव सुनंदा पवार, कार्यकारी अधिकारी निलेश नलवडे, मानवी संसाधन प्रमुख गार्गी दत्ता व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकुमार महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली यापरिषदेची तयारी सुरू आहे. या परिषदेसाठी गोवा, उत्तरप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र इत्यादी राज्यातून १५० हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनी, प्राध्यापक, संशोधक, लेखक, समुपदेशक, डॉक्टर सहभागी होणार आहेत असे परिषदेचे निमंत्रक डॉ. श्रीकुमार महामुनी यांनी सांगितले.
डॉ. सुलक्षा गवस- (गोवा), डॉ. अंशुल जैसवाल-(वाराणसी), डॉ. अंशू अग्रवाल (उत्तरप्रदेश), आनंद वाचासुंदर (गोवा), क्लिफोर्ड कॅस्टीलीनो-(गोवा), पुणे विद्यापीठ बी.ओ.एस चेअरमन डॉ. पुंडलिक रसाळ, पुणे विद्यापीठ मानसशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र मस्के, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे डॉ. बाळ राक्षसे आदी संशोधक, प्राध्यापक परिषदेमध्ये मार्गदर्शन करणार आहेत.
या परिषदेमध्ये सोशल मिडिया अँडीक्शन अँण्ड न्युरोसायन्स, सोशल मिडिया अँडीक्शन- स्ट्रेस, डिप्रेशन, मेंटल हेल्थ अँण्ड चॅलेंजेस, रोल ऑफ सोशल मिडिया अँण्ड इम्पॅक्ट ऑन चाईल्डवुड अँण्ड यूथ या विषयांवर संशोधक, प्राध्यापक विद्यार्थ्यांमध्ये परिसंवादाच्या माध्यमातून विचार विनिमय व मार्गदर्शन केले जाणार आहे. परिषदेचे उद्घाटन १६ फेब्रुवारी रोजी सकाळी  अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त व सचिव सुनंदा पवार व डॉ. सुलक्षा गवस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या परिषदेचा समारोप समारंभ डॉ. पुंडलिक रसाळ चेअरमन मानसशास्त्र अभ्यासमंडळ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.

You may have missed

error: Content is protected !!