वयोवृद्ध महिलेला पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न
बारामती : बारामतीत एका वयोवृद्ध महिलेला शरीर सुखाची मागणी करीत तिने विरोध केल्याने तिला पेट्रोल अंगावर ओतून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
बारामती शहरातील जळोची येथे हा प्रकार घडला असून या विषयी शहर पोलिस ठाण्यात वयोवृध्द महिलेने तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर हाकीकात अशी की वयोवृद्ध महिला फिर्यादी घरात एकटी असताना आरोपी फिर्यादीच्या घरात घुसला व फिर्यादीला शरीर सुखाची मागणी केली शिवाय जर का विरोध केला तर तुला पेट्रोल अंगावर टाकून पेटवून देण्याची धमकी दिली तर आरोपीला फिर्यादीने विरोध केल्याने अखेरीस आरोपीने फिर्यादीला पेट्रोल अंगावर टाकून पेटवून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न केला व घटनास्थळावरून पळून गेला यामध्ये फिर्यादील काही प्रमाणात भाजली असून बारामतीच्या एका खाजगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. तसेच ती राहत असलेल्या घरातील गरजेच्या वस्तू जळाल्या आहेत असे फिर्यादीत नमूद केले आहे.
