October 24, 2025

बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर मोर्चा

IMG-20240201-WA0071
बारामती :  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरावर ओबीसी  समाज बांधवांच्या वतीने मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी बांधव उपस्थित होते.
यावेळी बापूराव सोलनकर,  किशोर मासाळ, अनिल लडकत , गोविंद देवकाते, ज्ञानेश्वर कौले, जीबी गावडे, राजेंद्र बरकडे, प्रियदर्शिनी कोकरे,रोहित बनकर, निलेश टिळेकर, सचिन शाहीर, वनिता बनकर, देवेंद्र बनकर, रमेश कोकरे, नाना मदने, नवनाथ अपुणे यांची भाषणे झाली.
ओबीसी  समाज बांधवांच्या वतीने  राज्य शासनाने मराठा आरक्षणासंदर्भात ¨सगेसोयरे° या शब्दाची व्याख्या बदलून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ब दि. २६ जानेवारी २०२४ नुसार मसूदा काढला आहे. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आपला हा निर्णय मूळ ओबीसीवर अन्याय करणारा आहे. त्याचबरोबर शिंदे समिती ही घटनात्मक नसताना शिंदे समितीच्या शिफारसीवरून कुणबी प्रमाणपत्र देणे हे घटनाबाह्य आहे. मराठा समाजाच्या दबावाला बळी पडून सरकारने घेतलेल्या या बेकायदेशीर आणि मागासवर्गीयांसाठी अन्यायकारक असलेल्या या निर्णयाला आमचा विरोध आहे. तरी, दि.२६ जानेवारी 2024 अधिसूचनेचा मसूदा रद्द करण्यात यावा, राज्य मागासवर्ग आयोग व न्यायमुर्ती शिंदे समिती रद्द करण्यात यावी  तसेच चुकीच्या कार्यपध्दतीने व बेकायदेशिर रित्या वितरीत होणाऱ्या सदर कुणबी प्रमाणपत्र रद्ध करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
 यावेळी राज्यासरकार वर टीका करीत उपस्थितांनी ओबीसी  समाजाच्या आरक्षणाला धक्का लावल्यास समाज सहन करणार नाही असा इशारा सरकारला दिला.

You may have missed

error: Content is protected !!