October 24, 2025

 बारामतीचे प्रशासन करतय आंदोलकांची दिशाभूल ,…. वंचित बहुजन आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित

IMG-20240127-WA0216
बारामती :  बारामतीचे प्रशासन आंदोलकांची दिशाभूल करीत असल्याने, तसेच यापुढे प्रशासनाने योग्य दखल घेतली नाही तर सामोहिक आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देत,  बारामतीत वंचित बहुजन युवा आघाडीचे बेमुदत चक्री धरणे आंदोलन स्थगित करण्यात आल्याची माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी दिली.
बारामती शहरामधील मधील गट क्र.६/३/अ, ब, ६/४/अ, ६/४/अ/१,२ मधील जागेमध्ये एस. टी. महामंडळने मूळ मालकांना विचारात न घेता व जागेचा कोणताही मोबदला न देता बेकायदेशीर ताबा घेऊन त्यावर एस टी बस्थानाकाचे काम केले आहे. या जागेचे 7/12  उतारे हे आज ही मूळ जमीन मालकांच्या नावावरच आहेत. या जागेचे कोणत्याही प्रकारचे संपादन / हस्तांतरण झाले नाही, त्यामुळे ही जागा आज ही मूळ मालकांच्या नावावरील महार वतनाची जागा आहे. या संदर्भात 8 जानेवारी रोजीपासून वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने बेमुदत चक्री धरणे आंदोलन बारामती बस्थानकच्या समोर  सुरू होते मात्र आंदोलनाची प्रशासनाकडून  दखल न घेतल्याने आणि शासनाने टाळाटाळ व दिशाभूल केल्याने 19 व्या दिवशी,  26 जानेवारी रोजी वंचित बहुजन युवा आघाडी पुणे जिल्हा पूर्वच्या वतीने प्रांताधिकारी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढून सामोहिक आत्मदहन करण्याचा इशारा देऊन , ठिय्या आंदोलन करण्यात आले.
बारामतीचे प्रशासनाने दिशाभूल होईल अशी उत्तरे देत असल्याने यापुढे कायदेशीर उत्तर देऊ, तसेच जागा संपादन करण्यात आली नसल्याने व मूळ मालकांनी कोणताही दस्त, भाडेकरार, बक्षीस पत्र, अथवा कोणत्याही प्रकारच्या कागदावर सह्या केल्या नसल्याने एस. टी. महामंडळच अन ऑथराईज होल्डर आहे का ?  याबाबतची चौकशी करण्याची व जागा परत मूळ मालकांना करण्याची किंवा संपादन करण्याची कार्यवाही करून बारामती बसस्थानकाला विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी करण्यात आली आहे.  प्रशासनाने याबाबतची चौकशी करण्याचे पत्र दिल्याने आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करून पुढील लढाई ही प्रशासकीय तसेच कोर्टाची करण्यात येणार आहे.  जो पर्यंत याबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत बारामती बसस्थकाचे उदघाट्न होऊ देणार नाही अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष मंगलदास निकाळजे यांनी दिली.
यावेळी  जिल्हा उपाध्यक्ष गणेश थोरात, महासचिव प्रतिक चव्हाण, सहसचिव कृष्णा साळुंके, शहराध्यक्ष रियाज खान, सचिव विनय दामोदरे, मोहन शिंदे, सागर गवळी, अखिल बागवान, आनंद जाधव, जितेंद्र कवडे, मयूर सोनवणे, शिवाजी सोनवणे, सुरज गव्हाळे, दिनेश सोनवणे, आदेश निकाळजे, विकास माने, दत्ता चितारे, कांता सोनवणे, कविता सोनवणे, प्रिया सोनवणे, अनिता निकाळजे, आदी पदाधिकारी व मूळ मालक, तसेच बहू संख्य महिला उपस्थित होत्या.

You may have missed

error: Content is protected !!