October 24, 2025

जितेंगे और लढेगे, सत्याचा विजय होणारच : सुप्रिया सुळे

IMG-20240126-WA0091
बारामती : बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसने विविध सामाजिक उपक्रम करून वेगळी सामाजिक ओळख निर्माण  केली आहे, तर महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम आदर्शवत आहे त्याचप्रमाणे सध्याच्या घडामोडीमध्ये लढेंगे और जितेंगे त्याचप्रमाणे सत्याचा विजय होईल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.
बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यव्रत काळे यांच्या वतीने बारामती शहरांमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू व होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्याच्या बक्षीस वितरण प्रसंगी सुप्रिया सुळे बोलत होत्या. या  वेळी बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष ऍड. एस. एन. जगताप ,शहर अध्यक्ष ऍड संदीप गुजर, मा.नगरसेवक ऍड.सुभाष ढोले,मा. जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश खोमणे, तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वनिता बनकर, शहर युवती काँग्रेसच्या अध्यक्षा प्रियंका खरतोडे व  मा. नगरसेविका आरती शेंडगे,आदी मान्यवर उपस्तीत होते.
महिलांचे शिक्षण,विविध क्षेत्रात पदार्पण व उल्लेखनीय यश याचे श्रेय शरद पवार साहेब व आई प्रतिभा ताई यांना जाते त्यांच्या पुरोगामी विचारामुळे मी सुद्धा कणखर घडले. सत्यव्रत काळे यांनी महिलांसाठी केलेले कार्य आदर्शवत असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सत्यवत काळे यांचे कौतुक केले. तर आता पर्यंत घेतलेल्या कार्याचा आढावा घेऊन ,सामाजिक उपक्रम राबविताना महिलांनी दिलेली साथ यामुळे सामाजिक जीवनात यशस्वी झाल्याचे प्रास्ताविकात बारामती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यव्रत अर्जुनराव काळे यांनी सांगितले.
 प्रथम सीमा बडे, द्वितीय रोहिणी भापकर, तृतीय अंजली वणवे उत्तेजनार्थ अंकिता कुतवळ ,मयुरी शिंदे, ममता जाधव होम मिनिस्टर मधील विजेत्या  व उखाणे स्पर्धा मधील नेहा गोसावी शुभांगी गालफाडे यांना सुप्रिया सुळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन  सन्मानित करण्यात आले . होम मिनिस्टर  व हळदकुंकू कार्यक्रमात मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग हे खास वैशिष्ट्य ठरले. होम मिनिस्टर सादरीकरण अनिल सावळे यांनी केले व गायन सलीम सय्यद यांनी केले.

You may have missed

error: Content is protected !!