October 24, 2025

बारामतीच्या भ्रष्ट प्रशासकीय बाबूंच्या विरोधात आमरण उपोषण

FB_IMG_1706359496502
बारामती :   बारामतीमध्ये भ्रष्ट अधिकारी यांच्या विरोधात सेना , भाजपाच्या दोन सदस्यांचे बारामतीत प्रशासकीय  भवना समोर उपोषण  सुरु आहे. भाजपाचे महाराष्ट्र राज्य युवा मोर्चाचे माजी सदस्य अ‍ॅड.आकाश दामोदरे व शिवसेना पुणे ग्रामीणचे कार्याध्यक्ष वस्ताद सचिन उर्फ पप्पू  माने यांनी प्रशासकीय भवनासमोर देशाच्या प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण सुरु केले आहे. 
बारामती अनेक अवैध धंदे, भ्रष्टकारभार, अनेक ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी खुद्द सरकारी प्रशासकीय बाबूंनी केलेली पाठीराखन रुपी मक्तेदारी याला बारामतीकर नागरिक  वैतागून गेला आहे. यासाठीच प्रशासकीय भवनासमोर देशाच्या प्रजासत्ताक दिनी आम्ही आमरण उपोषण सुरू केले असल्याचे आंदोलकांनी बोलताना सांगितले.
अनेक ठेकेदारांनी मनमानी कारभार करून निकृष्ट दर्जाची अनेक ठिकाणी कामे करून बारामतीकरांच्या माथी मारण्याचे काम करत आहेत, तर बारामतीतील औद्योगिक वसाहतीत तात्कालीन मंत्री महोदयांचे हितसंबंध जोपासत एक भला मोठा भूखंड वाटप करण्यात आला आहे.  तर बारामतीच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि कर्मचारी यांनी चक्क कार्यालयीन कामकाजाच दलालांच्या हाती सोपविले आहे.  तेथील अधिकारी कर्मचारी यांचे काम दालालांशीवाय होत नाही,  शिवाय नियम डावलून मालवाहू,  मालवाहतूक करणाऱ्या तसेच ठेकेदारांच्या मोठ्या ट्रक, टिपर, कारखान्याचा ऊस वाहतूक करणारे ट्रकटर यावर उपप्रादेशिक अधिकारी किंवा कर्मचारी कारवाई का करत नाहीत हा  देखील सवाल उपस्थित होतो, तसेच बारामती उपप्रादेशिक परिवह विभागाच्या आशीर्वादाणे अनेक वाहने नियमबाह्य बेकायदा दिवसाढवळ्या वाहतूक होत असते मात्र त्यावर देखील कारवाई होत नाही हा संशोधनाचा विषय आहे.  
बारामती शहर आणि तालुक्याच्या अनेक लहान मोठ्या गावात सावकारी, हातभट्टी, जुगार, मटका तसेच देहविक्री आणि आमली पदार्थांची अवैध विक्री केली जात आहे. तसेच अनेक ठिकाणी गुटख्याची देखील विक्री होताना दिसत आहे ही विक्री कोणाच्या आशीर्वादाने आणि अभायाने चालू आहे असा प्रश्न आहे. तक्रारी देऊन देखील कारवाई होत नाही,  या सर्व प्रश्नाच्या उत्तरासाठीच आम्ही प्रशासकीय भवनासमोर, प्रत्यक्ष प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी, प्रशासनाविरोधात आमरण उपोषण करीत आहोत असेही सांगितले.  

You may have missed

error: Content is protected !!