माई फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर संपन्न

बारामती : माई फोउंडेशन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सदरील रक्तदान शिबिराचे उदघाटन दत्तात्रेय बाजीराव काळे, दिलीप बाजीराव काळे, सुरेश बाजीराव काळे व शहाजी बाजीराव काळे यांचे हस्ते संपन्न झाले.
माई फाउंडेशन ट्रस्ट बारामती या संस्थेच्या वतीने आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करण्यात येते, सदरील संस्थेमार्फत नुकतेच रक्तदान शिबिर घेण्यात आले होते यामध्ये मोठ्या प्रमाणात युवक व मित्रपरिवार हे उत्फूर्त सहभागी होत या रक्तदान शिबिरामध्ये तब्बल 206 रक्तदात्यांनी रक्तदान केले. रक्त संकलन इंदापूरच्या मुक्ताई ब्लड बँक यांनी केले यावेळी ब्लड बँकेचे संचालक अविनाध ननावरे हे स्वतः उपस्थित होते त्यांनी उपस्थित आयोजक आणि रक्तदाते यांचे आभार मानत समाधान व्यक्त केले.
संस्थेचे अध्यक्ष अॅड. वैभव काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून अशी माहिती मिळाली की वर्षभर ट्रस्टमार्फत विविध सामाजिक शैक्षणिक कामाची रूपरेषा आखलेली आहे वर्षभर विविध समाज उपयोगी कामे ट्रस्ट मार्फत केली जातात यावेळी संस्थेतीच्या पदाधिकारी यांनी यथोचित रक्तदात्यांचे स्वागत, आभार मानले .
रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी चारुदत्त काळे, ऋषिकेश काळे, मृगराज काळे, सनी काळे, अॅड विवेक बेडके, अॅड. बाबाजान शेख, आकाश काळे, अॅड. महेश पवार, अॅड. रियाज खान, युवराज जाधव, फिरोज झारेकरी, अभिजीत सुपेकर, विजेंद्र काळे, विश्वजीत काळे, विशाल काळे, युवराज काळे, सुजल काळे, अक्षय व्होरा, निखिल जाधव, सचिन रत्नपारखे, अमन पठाण, मयूर मुसळे यांनी विशेष परिश्रम घेतले.