चर्मकार समाजाचा राज्यस्तरीय वधू वर सूचक मेळावा संपन्न

बारामती : हराळे वैष्णव समाज संघ बारामती व संत शिरोमणी रविदास समाज विकास संस्था पुणे संचलित रेशीम बंध वधू वर सूचक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील संत रोहिदास समाज मंदिरात राज्यस्तरीय चर्मकार समाज वधू – वर सूचक मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात बारामतीसह इंदापूर, दौंड फलटण आदी परिसरातील तसेच कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातून इच्छुक वधू वर मोठया संख्येने उपस्थित होते .
या वधू वर मेळाव्याचे उदघाटन बारामती नगर परिषदेचे मा. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या हस्ते झाले यावेळी चर्मकार उद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सर्वश्री ज्ञानेश्वर कांबळे, संत शिरोमणी रविदास समाज विकास संस्थेचे अध्यक्ष सुखदेव सूर्यवंशी, यांच्यासह महेश आगवणे, अशोक कांबळे, भाऊसाहेब कांबळे, भगवान मस्तुद, चंद्रकांत कांबळे, राजाभाऊ शिर्के, वसंतराव कांबळे, संजय साळुंके आदी उपस्थिती होते.
याप्रसंगी उपस्थितना मार्गदर्शन करताना गुजर म्हणाले सध्या सर्वच जाती धर्मामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या कमी असल्यामुळे मुलांचे विवाह जमविणे अवघड झाले आहे. अशा परिस्थितीतं रेशीम बंद वधू वर सूचक मंडळाच्या माध्यमातून वधू वर सूचक मेळावा घेऊन एक चांगला उपक्रम राबविल्या बद्दल आयोजकांचे कौतुक केले.
याप्रसंगी उपस्थितांचे आभार हराळे वैष्णव समाज विकास संस्था बारामतीचे संस्थापक अध्यक्ष नितीन आगवणे यांनी मानले तर प्रास्ताविक चंद्रकांत कांबळे यांनी केले.