अकॅडमी प्रकरणात प्रशासन का स्तब्ध…..?
बारामती : बारामतीत सुरु असलेला शिक्षणाचा गोरख धंदा म्हणजेच अकॅडमी, या अकॅडमी बाबत बारामतीमधील प्रशासन मात्र का स्तब्ध आहे हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
बारामतीमधिल अनेक अकॅडमी या राज्य शासनाच्या शिक्षणाच्या नियमावलीला पायदळी तुडवून राजरोसपणे सुरु आहेत मात्र या अकॅडमी नावाच्या मृगजळाची वास्तूस्थिती सांगण्याचे धाडस किंवा त्याचा बिमोड करण्याचे शौर्य मात्र बारामतीच्या हात ओले केलेल्या स्थानिक प्रशासनास नाहीत की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
प्रत्यक्ष शिक्षण घेत असलेले विद्यार्थी हे इतरत्र असलेल्या शिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊन अकॅडमीमध्ये शिक्षण घेत आहेत, अनेक निवेदने, पुरावे तसेच आंदोलने करून देखील हे बारामतीचे निर्ढावलेले प्रशासन मात्र कारवाईचे वगनाट्य करून देखील स्तब्धच आहे. मागच्या दोन महिन्यांपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून फायर ऑडीटच्या नावाखाली 18 अकॅडमीवर, कागदावर कारवाई केली खरी मात्र प्रत्यक्षात नावापुरतीच आणि दाखविण्यापुरती ही कारवाई केली की काय ? हा देखील प्रश्न अनुत्तरीतच आहे. त्या केलेल्या कारवाईचे नंतर पुढे काय झाले किती फाईली आल्या आणि कोणत्या निकषाने कोणाला कसे फायर ऑडीट प्रमाण पत्र दिले हे देखील प्रशासनाने गुलदस्त्यातच ठेवले आहे.
शेवटी प्रश्न पडला आहे की, स्थानिक स्वराज्य संस्थेने केलेली कारवाई हे मृगजळ की, अकॅडमीच्या चालकांनी पालकांना सभोताली लावलेले भुरळ म्हणजे मृगजळ… हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. अकॅडमी म्हणजे काय ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पुन्हा नव्या दमाने वरिष्ट पातळीवर…. प्रयत्न सुरु….
