शारदाबाई पवार महिला महाविद्यालय येथे रक्तदान शिबिर संपन्न

बारामती : ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शारदाबाई पवार महिला आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, शारदानगर बारामतीच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरास विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद देत 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले. बारामती येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट माणिकबाई चंदुलाल सराफ रक्तपेढीच्या सहाय्याने रक्तदान शिबिराचे आयोजन महाविद्यालयामध्ये करण्यात आले होते. या शिबिरास प्राचार्य डॉ. एस्. व्ही. महामुनी, कला व वाणिज्य प्रमुख डॉ. एम.आर. निंबाळकर यांचे मार्गदर्शन मिळाले. सदर शिबिरास ट्रस्टच्या शैक्षणिक संकुलातून परीक्षांच्या कालावधीतही उत्तम प्रतिसाद मिळाला. यामध्ये आयटीआय आणि नर्सिंग विभागातील विद्यार्थ्यांनी उत्फूर्त सहभाग नोंदवला.
या वेळी ब्लड बँकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश बारवकर उपस्थितीत ब्लड बँकेच्या सर्वच कर्मचारी वर्गाने सहकार्य केले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रम अधिकारी डॉ.ए.एस.सोनवणे, डॉ. एस. एस. डांगे आणि प्रा. एम. एस. निंबाळकर यांनी शिबिराचे यशस्वी रीत्या नियोजन केले होते रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान या उक्तीस अनुसरून रक्तदात्यांनी रक्तदान केले. राष्ट्रीय सेवा योजना समितीने रक्तदात्यांचे आभार मानले.