मी साठीनंतर नर्णय घेतला तर काय बिघडले…. अजित पवारांचा सवाल

बारामती : त्यांनी 38 व्या वर्षीच बंड केला होता मी मी साठीनंतर नर्णय घेतला तर काय बिघडले असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित करीत शरद पवार यांच्यावर निशाना साधला.
बारामती तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंचांच्या सत्कार सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की ज्यांना माझ्यासोबत काम करायचे आहे त्यांनी माझ्याकडे या, ज्यांना दुसऱ्या गटात जायचे आहे त्यांनी खुशाला जावे पण आता कठोर भूमिका घ्यावी लागेल, अशी भूमिका स्पष्ट केली तर भविष्यात शरद पवार गटाविरुध्द आपण उभे ठाकणार असल्याचेच संकेत भाषनादार्म्यान अजित पवार यांनी दिले.
तर माझ्यामागे आज 43 विधानसभेतील, दोन अपक्ष व विधानपरिषदेतील सहा आमदार सोबत आहेत, याचा अर्थ माझी भूमिका या सर्वांना पटल्यानेच हे सार्वजन माझ्यासोबत आले आहेत. मी साठीत ही भूमिका घेतली काहींनी वयाच्या अडोतिसाव्या वर्षीच घेतली होती. वरिष्ठांनी आता मार्गदर्शन करावे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा नामोल्लेख टाळत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांची स्तुती देखील केली.
मी जी भूमिका घेईल ती कायम बारामतीकरांच्या हिताचीच असेल. ज्या दिवशी बारामतीचे हित जोपासले जात नाही, असे लक्षात येईल त्या दिवशी अजित पवार वेगळी भूमिका निश्चितच घेईल. देशापुढे आजच्या घडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशिवाय दुसरे कणखर नेतृत्व दिसत नाही, नवीन भूमिका घेतल्यानंतर उगाच इकडेही आणि तिकडेही असे नको, माझ्यासोबत यायचे असेल तर या नाहीतर तिकडे जा, अशा शब्दात पदाधिकारी- कार्यकर्ते यांना समाज दिली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत, यापूर्वी मी वडिलधारी माणसाच्या मागे उभे रहायचो आता या मोठ्या लोकांशी माझ्या ओळखी झाल्या आहेत माझ्या भूमिकेबाबत वेगळ्या चर्चा होत आहेत, मात्र मी शब्द देतो मी बारामती करांचे हित ज्यात आहे तेच मी करेन असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.