December 9, 2025

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार व पोलिसांची वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन.

Picsart_23-12-13_19-17-06-319
बारामती  :   पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या 83 व्या वाढदिवसानिमित्त पत्रकार व पोलिसांची मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वप्नील विष्णुपंत चव्हाण मित्र परिवार बारामती, पत्रकार संघ बारामती, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय बारामती व बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार व पोलीस कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार येथील शासकीय उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय बारामती येथे करण्यात येणार आहे .
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 22 डिसेंबर 2023 रोजी  सकाळी 10 वाजता शिबिराचे आयोजन केले आहे. तरी सर्व पोलीस कर्मचारी व सर्व पत्रकार यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उपजिल्हा रुग्णालय बारामतीचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.महेश जगताप  व सामाजिक कार्यकर्ते विष्णुपंत चव्हाण पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉ. विजय भिसे व बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांनी केले आहे.
error: Content is protected !!