बारामतीच्या इंडियन मेडिकल असोसिएशनला सर्वोत्कष्ट शाखेचा सन्मान

बारामती : इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने देण्यात येणारा सर्वोत्कष्ट शाखेचा सन्मान बारामतीच्या शाखेला देण्यात आला. तर बारामती शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश आटोळे यांना सर्वोत्कष्ट अधक्षपदाचा पुरस्कार देण्यात आला.
अमरावती येथे झालेल्या वार्षिक संमेलनात राज्याचे अधक्ष डॉ. रवींद्र कुटे व सचिव डॉ. संतोष कदम यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या वेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे मा. अध्यक्ष डॉ. अशोक तांबे, केंद्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य डॉ. एम. आर. दोशी, तसेच बारामती मधील डॉ. अमर पवार, डॉ. अमोल भंडारे, डॉ. अश्विनीकुमार वाघमोडे उपस्थित होते. मागील एक वर्षामध्ये आपल्या अध्यक्षपदाच्या कर्यकळमध्ये केलेल्या कामांबद्दल हे पुरस्कार डॉ. अविनाश आटोळे व इंडियन मेडिकल असोसिएशन बारामतीला देण्यात आले.