October 24, 2025

रक्तदान शिबिर संपन्न

IMG-20231127-WA0030 (2)
बारामती : 26 नोहेंबर रोजी मुंबईमध्ये झालेल्या  अतिरेकी आत्मघाती हल्ल्यांमध्ये हुतात्मा झालेल्या पोलीस बांधव आणि कर्मचारी यांना श्रद्धांजली म्हणून एक जीव सेवा संघ बारामती, सायकल क्लब, साहस एडवेंचर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिबिरात 107 रक्तदाते उत्फूर्तपणे रक्तदान केले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांच्या  हस्ते संपन्न झाले या वेळी पोलीस निरीक्षण केंद्र नानवीजचे पोलीस निरीक्षक  विनय कणसे, सेवानिवृत्त पोलीस महासंचालक  सुरेश खोपडे आणि भारत फोर्ज बारामती विभागचे अध्यक्ष संजय अग्रवाल उपस्थित होते, या कार्यक्रमा प्रसंगी बारामती परिसरातील सामाजिक कार्य करणारे आभाळ माया ग्रुप, दुर्गवेडे बारामतीकर ग्रुप, ग्रीन वर्ल्ड फाउंडेशन ग्रुप, ड्रीम डान्स अँड स्पोर्ट्स अकॅडमी या ग्रुपचा  सन्मान  करून त्यांच्या कामाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या तर या कार्यक्रमा प्रसंगी उपस्थितांचे स्वागत संजय अग्रवाल अध्यक्ष भारत फोर्ज बारामती यांनी केले, प्रस्ताविक बसवेश्वर भैसे यांनी केले आभार अविनाश भोसले यांनी मानले तर सूत्रसंचालन महेश जाधव यांनी केले, रक्तदान शिबिराचे आयोजन एक जीव सेवा संघ, बारामती सायकल क्लब आणि साहस एडवेंचर यांनी केले होते यावेळी एकूण 107 रक्तदाते यांनी रक्तदान केले

You may have missed

error: Content is protected !!