बारामतीत भाजपा कार्यकर्त्यामध्ये नाराजीचे सुर

बारामती : काही दिवसापूर्वी बारामती शहर व तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षाच्या निवडी झाल्या सदर निवडी कार्यकर्त्यांना विचारात न घेता केल्याने तसेच पक्षात सक्रीय असणा-या कार्यकर्त्यांना डावलल्याने बारामती शहर व तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यामध्ये नाराजीचे सुर असल्याचे भाजपाचे युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष नितीन मदने व अनेक कार्यकर्त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली.
संधी साधुन राजकारण करणा-या पक्षातील स्थानिक पदाधिकारी यांचे स्वार्थ आणि स्वतःच्या वैयक्तिक राजकारणापोटी फक्त कराखान्याच्या राजकारणात ताकद वाढवण्यासाठी यांनी तालुका अध्यक्षाची निवड केली. मात्र निवडलेले अध्यक्ष अगदी पि. के. चित्रपटातील परग्रहावरून आल्यासारखे पक्षातील सक्रीय कार्यकर्त्यांना अनभिग्न आहेत. तिच अवस्था शहराची आहे. अपक्ष म्हणून नगरपालीका निवडणुक लढवणा-या व कार्यकर्त्यांना अध्यक्ष नेमके कोण आहेत हे माहीतच नाहीत असे अध्यक्ष शहरावर लादले असल्याची नाराज कार्यकर्त्यांनी खदखद व्यक्त केली. तर पक्षश्रेष्ठीकडे रूसून फुगुन बालहटट्च नव्या पदाधिकारी यांची निवड केली आहे असेही मदने यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
सध्या कार्यरत पदाधिकारी हे वरिष्ठ नेत्यांची नावे वापरून पक्षसंपवण्याचे अनोखे राजकारण करत आहेत. व स्वतःच्या महत्वकांक्षेपोटी राजकारण करणा-या स्थानिक पदाधिकारी यांची राजकारणाची माहिती हि संपूर्ण बारामती करांना आहे. आंदोलन करायचे झाले की राजू शेट्टीची शेतकरी कृती समिती, दादा सत्तेत आले की मोळी टाकायला राष्ट्रवादी, आपली सत्ता आली की लगेच उडी मारून भाजपा मध्ये, कामे अडली की शिवतारे बापूंची शिवसेना, आणी निवडणुक लढायची वेळ आली की अपक्ष नेते सांगा सांगा तुम्ही आहात तरी नेमके कोणाचे ? असा सवाल उपस्थित केला.
यांच्या दुटप्पी राजकारणाचा उद्रेक बारामती तालुक्यातील व शहरातील भाजपा कार्यकर्ते लवकरच करणार असून निवडणुकीच्या तोंडावर मनमानी कारभारामुळे अनेक कार्यकर्ते पक्षाला राम-राम ठोकून इतर पक्षात गेली आहेत. यापुढेही अनेक कार्यकर्ते पक्ष सोडून जाण्याची शक्यता नाकरता येत नाही. कारण कार्यकर्त्यांची व्यथा नेमकी मांडावी कोणापुढे याची चर्चा सर्वसामान्य कार्यकर्ता व जनसामान्यात आहे अशी पक्षातील खदखद मदने यांनी प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केली आहे.