मुख्यधिकारी यांच्या दालनात अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहनाचा प्रयत्न….बारामतीत तणाव सदृश्य स्थिती

बारामती : बारामतीत टिपु सुलतान यांच्या जयंतीवर बंदी आणावी व दिलेली परवानगी रद्द करावी या कारणासाठी बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांनी चक्क मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्या दालनातच अंगावर रॉकेल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने बारामतीत काही काळ तणावाची स्थित निर्माण झाली होती
टिपु सुलतान जयंती निमित्त शहरात स्वागत कमानी व प्लेक्स प्रशासनाच्या परवानगीने लावण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल यांच्या वतीने बारामती शहर पोलिसांना हरकत घेत जयंतीला विरोध करण्यात आला आणि प्रशासनाने दिलेली परवानगी रद्द करण्याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले, पोलिस प्रशासनाने शांतता बैठक घेत जयंती आयोजक आणि हरकतदार यांची मिटिंग घेत सामोपचाराने मार्ग काढला मात्र पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकी नंतर हरकतदार बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पावित्रा घेत थेट मुख्यधिकारी महेश रोकडे यांचे दालन गाठले, यावेळी चर्चा सुरु असतानाच बाबुराव महादेव कारंडे व अक्षय देवकाते या दोन युवकांनी अंगावर रॉकेल ओतुन घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला यावेळी पोलिस प्रशासन यांनी वेळीच हरकत घेत युवकांना ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला.
झालेल्या घटनेचे वृत्त बारामतीत वाऱ्यासारखे गेल्याने काही काळ तणावाचे वातावरण झाले होते. त्यामुळे नगरपालिका परिसरात एकाच गर्दी होऊ लागली झालेली गर्दी पोलिसांनी पांगविल्यानंतर परिस्थिती आटोक्यात आली तर नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे यांनी केले आहे.