जन्माने असलेली जात लपविता येत नाही ….शरद पवार

बारामती : जन्माने असलेली जात लपविता येत नाही, माझ्या जातीचा उल्लेख असलेला शाळेचा दाखला व्हायरल केला जात आहे तो खरा असल्याचे पवारांनी सांगितले. तर ते म्हणाले, की ‘मी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये होतो. त्या शाळेचा दाखला खरा आहे. त्यावरील जात, धर्माचा केलेला उल्लेख खरा आहे. मात्र, काही लोकांनी इंग्रजीतील माझ्या जातीपुढे ओबीसी लिहून दुसरा दाखला फिरवला. मला ओबीसी वर्गाबद्दल आदर आणि आस्था आहे. जन्माने जी प्रत्येकाची जात असते ती लपविता येत नाही. माझी जात सगळ्या जगाला माहित आहे. असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांनी व्यक्त केले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचा ओबीसी चा शाळा सोडल्याचा दाखला समाजमाध्यमात वायरल केला जात आहे त्या प्रश्नावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दाखल्याबाबत स्पष्टीकरण दिले.
पुढे पवार म्हणाले की, जातीवर समाजकारण आणि राजकारण मी कधी केले नाही आणि करणारही नाही, मात्र समाजाच्या प्रश्नावर जे काही प्रयत्न करता येतील ते मी नक्कीच करण्याचा प्रयत्न करीन असेही पवार यांनी स्पष्ट केले.