रेवा भारकड हिची राष्ट्रीय कराटे स्पर्धेत निवड

बारामती : दि. 18 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर 2023 रोजी तालकाडो स्टेडियम, दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय सब ज्युनिअर कराटे स्पर्धेत बारामती शहरातील बारामती कराटे क्लबची रेवा भारकड या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनिअर कराटे स्पर्धेमध्ये बारामती शहरातील बारामती कराटे क्लबच्या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले असून त्या सर्वच कारटे स्पर्धकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
राष्ट्रीय कराटे स्पर्धेत महाराष्ट्र संघात रेवा भारकड ( 52 किलो, अतिल, 13 वयोगटात कुमिते ) या गटात महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. रेवा भारकड हि डॉ.सायरस पूनावाला, विद्या प्रतिष्ठान या शाळेची विद्यार्थिनी आहे. बारामती कराटे क्लबचे प्रमुख प्रशिक्षक मास्टर मिननाथ भोकरे यांच्याकडून कराटे प्रशिक्षण घेत आहे.