October 24, 2025

बारामतीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलने बाजी मारली….गावनिहाय विजयी उमेदवारांची यादी

Picsart_23-11-06_19-12-30-475

32 पैकी 29 ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी पुन्हा…….

बारामती ( वार्ताहर ) बारामती तालुक्यातील ३१ ग्रामपंचायत निवडणुकीची मतमोजणी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वर्चस्व कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.  राष्ट्रवादीतील फुटीनंतर बारामतीचे नागरिक कोणाला साथ देणार याकडे लक्ष लागले होते. मात्र निकालानंतर बारामतीत राष्ट्रवादीचाच वरचष्मा असल्याचे निकालानंतर पाहायला मिळाले.

बारामती तालुक्यातील ३२ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर झाली होती. त्यापैकी तालुक्यातील मानाजीनगर ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. तर उर्वरीत ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडले. त्यामध्ये 30 ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचे वर्चस्व राहिले आहे. बारामतीतील प्रशासकीय भवनात सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात करण्यात आली. मतमोजणीच्या नऊ फेऱ्या पार पडल्या. त्यामध्ये पहिल्या फेरीत पानसरेवाडी, भोंडवेवाडी, आंबी बुद्रुक, गाडीखेल,  म्हसोबानगर, पवईमाळ या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली.

दुसऱ्या फेरीत करंजे, जराडवाडी, सिद्धेश्वर निंबोडी, मगरवाडी, दंडवाडी, कुतवळवाडी या ग्रामपंचायतींची मोजणी करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या फेरीत चांदगुडेवाडी, साबळेवाडी, वंजारवाडी, चौधरवाडी, उंडवडी क.प, काळखैरेवाडी या ग्रामपंचायतींची मतमोजणी झाली. चौथ्या फेरीमध्ये सायंबाचीवाडी, धुमाळवाडी, करंजेपूल, कऱ्हावागज, कोऱ्हाळे खुर्द, पाचव्या फेरीत मेडद, शिर्सुफळ आणि पारवडी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली.

पारवडी ग्रामपंचायत निवडणुकीत चिठ्ठीने सरपंच पदाची निवड करण्यात आली. त्यामध्ये भाजप पुरस्कृत उमेदवाराची चिठ्ठी निघाली. त्यानंतरच्या टप्प्यात मुढाळे, सुपे, गुणवडी, डोर्लेवाडी आणि काटेवाडी ग्रामपंचायतीची मतमोजणी झाली. यात एकूण 32 पैकी 29 ग्रामपंचायतीवर अजित पवार यांच्या पॅनलचे वर्चस्व असल्याचे पहायला मिळाले. तर चांदगुडेवाडीत भाजपचा सरपंच निवडून आला आहे, बारामती तालुक्यातील पारवडीतही भाजप उमेदवाराचा विजय झाला आहे. तर खुद्द पवारांच्या काटेवाडी गावात देखील भाजपाचे दोन उमेदवार निवडून आले आहेत मात्र इतरत्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विचाराच्या पॅनलची  पकड पावर फुल्ल असल्याचे समोर आले.

बारामतीचे नाव निघाले की खा. शरद पवार आणि शरद पवार यांची बारामती हे समीकरण मागच्या 50 वर्षांहून अधिक काळ रुढ आहे. बारामती शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. मात्र राष्ट्रवादी पक्षातच फूट पडली असल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक झाली. यात बारामतीकर कुणाला आपला पाठिंबा देणार ?  बारामती शरद पवारांची की, अजित पवारांची ? अशा चर्चेला उधान आले होते तर काका पुतण्याचा पॅनल सामोरा – समोर निवडणुकीच्या रिंगणात येणार का ? अशा एक ना अनेक चर्चेला उधाण आले होते मात्र अखेरीस शरद पवार गटाने ग्रामपंचायत निवडणुकीत सहभाग घेतला नसुन सध्या पक्ष बांधणी सुरु असल्याचे शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अॅड एस.एन. जगताप यांनी स्पष्ट केले. 

गाव व उमेदवार निहाय निकाल पाहण्यासाठी खालील निळ्या अक्षरांवर क्लिक करा.  

ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2023 बारामती तालुका

You may have missed

error: Content is protected !!