6 नोव्हेंबर रोजी धम्मरथ बारामतीत येणार…

बारामती : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया च्या संस्थेमार्फत पुणे जिल्हा पूर्व, अंतर्गत धम्मरथ दिनांक 1 नोव्हेंबर ते 11 नोव्हेंबर 2023 रोजी निघणाऱ्या या धम्मरथ रॅलीचा प्रवास हा 6 नोव्हेंबर रोजी बारामती तालुक्यांमध्ये नीरा मार्गे येणार आहे. निंबूत या गावांमधून बारामती तालुक्यामध्ये येत असून करंजेपूल, मुरूम, वडगावनिंबाळकर, चोपडज, कोऱ्हाळे, माळेगाव,कऱ्हावागज, मेडद, मार्गे बारामती शहरांमध्ये कसबा या ठिकाणी येणार आहे. तसेच कसब्यातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे प्रतिभा नगर मार्गे, सिद्धार्थनगर बुद्ध विहार, महात्मा फुले नगर, भीमनगर, सुहास नगर, मार्गे चंद्रमणीनगर बुद्ध विहार या ठिकाणी रथ मुक्कामी येणार आहे.
तरी सर्व बारामती तालुक्यातील व शहरांतील बौद्ध उपासक तसेच उपासिकांनी या धम्म रॅलीमध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे व धम्म रॅलीचे उत्साह पूर्वक स्वागत करून या धम्म रॅलीची शोभा वाढवावी असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष पुण्यशिल लोंढे व बारामती शहराध्यक्ष किरण भोसले यांनी केले आहे.