October 24, 2025

प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बारामती शहरात  334 घरकुले मंजूर

pmay
बारामती : एक वर्षाहून अधिक काळ प्रलंबित असलेले प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या बारामती मधील 334 घरांना शासनाकडून मंजूरी मिळाली असल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
         प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्र.४ ( स्वमालकीच्या जागेवर घराची निर्मिती करणे ) अंतर्गत बारामती नगरपालिका हद्दीतील 334 घरकुले मंजूर झाली आहेत. बारामती नगर परिषदेकडून माहे ऑक्टोबर 2022 रोजी, टप्पा क्र पाच मध्ये १०५  घरकुले तसेच ऑक्टोबर 2023 रोजी टप्पा क्र. सहामध्ये २२९  घरकुले असे एकूण ३३४ घरकुले शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. सदर ३३४ घरकुलांना केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे. सदर ३३४ घरकुलांना शासनाकडून रुपये ८३५ लक्ष इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी घरकुलाचे काम सुरु करावे व निधी मागणी करावी असे आवाहन मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.

You may have missed

error: Content is protected !!