खा. शरद पवार यांना मराठी कुरआन व इस्लामिक मराठी साहित्य भेट

बारामती : हजरत मोहम्मद पैगंबर जयंतीचे औचित्य साधून बारामती शहरातील मरहुमा फरजाना मा फाऊंडेशन, बारामती यांनी इस्लाम सर्वांसाठी हा उपक्रम राबविला होता त्याच उपक्रमा अंतर्गत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व खा. शरद पवार यांना मरहुमा फरजाना मा फाऊंडेशन तर्फे मराठी कुरआन व इस्लामिक मराठी साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी बारामती मुस्लिम आम जमातचे अध्यक्ष हाजी जब्बार पठाण, मरहुमा फरजाना मा फाऊंडेशनचे अध्यक्ष जहीर पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष व जेष्ठ माजी नगरसेवक अॅड. सुभाष ढोले, अॅड. अमित ढोले, तांबोळी जमात बारामती अध्यक्ष मुनीर तांबोळी उद्योजक समीर मुलाणी, एजाज अत्तार, जावेद बागवान, अमान पठाण आदी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्रातील शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांबद्दल चर्चा झाली,
सध्याची राज्यातील राजकीय परिस्थिती ही विचारहिन व गोंधळलेल्या अवस्थेत असुन यासंदर्भात पुढील काळात आपल्याला पुरोगामी विचारांबद्दल प्रामाणिक राहून हा विचार लोकांपुढे मांडावा लागेल तसेच या विचारांची लेखक प्रवक्ते आणि तरुण विचारवंत हा विचार समाजापुढे मांडत आहे अशी चर्चा व मार्गदर्शन केले, तसेच येणाऱ्या भविष्यकाळात देशाची तसेच राज्याची राजकीय परिस्थिती कशी असेल याबाबत माहिती दिली त्याचबरोबर मरहुमा फरजाना मा फाउंडेशनच्या उपक्रमाची माहिती पवार यांनी घेतली तसेच माझ्या सुरवातीच्या राजकीय कारकीर्द पासून बारामती मुस्लिम समाज बांधव हे नेहमी सामाजिक ऐक्याचे विचारांसोबत राहिला आहे, यामुळेच बारामतीच्या पंचक्रोशीतील मुस्लिम बांधव कधीही कोणत्याही चुकीच्या विचारांसोबत जाणार नाही हा बारामतीच्या मुस्लिम समाजाबद्दल गेल्या पन्नास वर्षापासूनचा आत्मविश्वास आजही अबाधित आहे हे आवर्जून सांगितले व मुस्लिम समाज गेल्या पन्नास वर्षापासून त्यांच्या सोबत असण्याचा देखील खा. शरद पवार यांनी विश्वास व्यक्त केला, तर मरहुमा फरजाना मा फाऊंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले.