गणेश (तात्या) जगताप मित्र मंडळाचा पणदरेत रक्तदानाचा स्तुत्य उपक्रम
बारामती : बारामती तालुक्यातील दानशूर व्यक्तिमत्व माळेगाव सहकारी साखर कारखाण्याचे विद्यमान चेअरमन अॅड. केशव जगताप यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
महालक्ष्मी उद्योग समुहाचे डायरेक्टर व माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन सातव यांच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्घाटन संपन्न झाले यावेळेस बारामती तालुक्यातील राजकीय क्षेत्रातील दिग्गज नेते मंडळी आवर्जून उपस्थित होते युवकांबरोबर महिला वर्गांनी रक्तदान शिबिरात उस्फूर्त प्रतिसाद नोंदवला मानाजी नगर ग्रामविकास मंचाचे कार्यकर्ते व महिलावर्ग गणवेशात उपस्थिती लावून रक्तदान केले, तोही क्षण सर्वांना प्रेरणादायी होता पणदरेतील तरुण व्यक्तिमत्व गणेश जगताप व मित्रमंडळाने केशव बापूंच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने सात्विक कार्यक्रम घ्यायचा हा विषय पुढे आला आणि त्याच अनुषंगाने दोन दिवसात रक्तदानाचा निर्णय घेतला आणि पणदरे पंचक्रोशी नव्हे तर बारामती तालुक्यातील तरुणांनी उस्फूर्त प्रतिसाद देत ३०७ रक्त बाटली रक्तसंकलन करण्यात आले. या शिबिराची खास बाब म्हणजे राजस्थान वरून आलेले पाहुण्यांनी रक्तदान नियोजन पाहून रक्तदान शिबिरात योगदान दिले, दोन दिवसातले नियोजनावर गणेश (तात्या) जगताप मित्र मंडळाने ३०७ बाटल्यांचे विक्रमी रक्तदान केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गणेश (तात्या) जगताप यांचे आवर्जून कौतुक केले व युवकांनी अशा कामातून प्रेरणा घ्यावी या सुचना केल्या. या शिबिराची कौतुकाची बाब म्हणजे कोणतेही भेट वस्तू नसताना झालेलं रक्तदान नक्कीच कौतुकास्पद होते व झालेले सर्व संकलित रक्त संकलन आपल्या स्थानिक बारामती रक्तपेढीने केल्याने त्याचा स्थानिक रुग्णांना उपयोग होणार असल्याने या या उपक्रमाचे कौतुक पणदरे पंचक्रोशीतून सर्व स्तरातून होत आहे झालेल्या रक्तदानात सर्व तरुण जेष्ठ सहकार्यांनी दिलेले योगदान या मुळे आपन हे काम करू शकलो, तसेच स्वराज सोशल फाउंडेशन, पणदरे ग्रामविकास मंच, ओंकार फाउंडेशन, सुनेत्राजित फाउंडेशन व सिद्धेश्वर सकुल यांचे विशेष सहकार्य लाभले. बारामती रक्ताचा तुटवडा पाहता या रक्तदान शिबिरामुळे बारामती तालुक्यातील नागरिकांना साधारण एक महिना रक्त साठा पुरेल अशी मनस्वी भावना रक्तपेढीच्या डॉक्टरांनी व्यक्त करून आयोजक गणेश तात्यांचे आभार मानले. रक्तदानाच्या सात्विक कामाचे केशव बापू नीही कौतुक केले समाजातील प्रत्येक घटकांनी नोंदवलेल्या सहभागामुळे आपण हे शिबीर यशस्वी करू शकलो या भावना उद्योजक वैभव जगताप व आयोजक गणेश तात्या जगताप यांनी व्यक्त केल्या.
