December 9, 2025

अखेर ॲकॅडमीना नगरपालिकेने ठोकले टाळे

IMG_20231025_170656 (1)

बारामती : बारामती नगरपालिकेने राज्यात ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेत बारामतीतील खाजगी आणि बेकायदेशीर सुरु असलेल्या ॲकॅडमीना अखेर टाळे ठोकण्यास नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने सुरुवात केली आहे.

या ॲकॅडमी कारवाईचे अनेक नाट्यमय घडामोडीनंतर  स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासानाने मनावर घेवून कारवाईला सुरुवात केली आहे. मागील काही महिन्यांपासून केलेल्या एका दैनिकाच्या वृत्त मालिकेची तसेच सामाजिक कार्यकर्ते मोहसीन पठाण यांनी केलेल्या प्रशासकीय पाठपुराव्याची दाखल घेत बारामतीच्या नगरपालिकेने शहर परिसरातील ॲकॅडमीना टाळे लावण्यास सुरुवात केली आहे. तर टप्या-टप्याने सर्वच ॲकॅडमीवर प्रशासकीय कारवाई होणार आहे.

बारामती परिसरात अनेक बोगस शिक्षण संस्थांचे प्रस्त चांगलेच वाढले आहे, तर सध्या अनेक ॲकॅडमी या विना इमारत परवाना तसेच त्या इमारतींना फायर ऑडीट केले नसल्याच्या कारणाने नगरपालिकेच्या वतीने संबंधित ॲकॅडमीना सील करण्यात आले आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरात अॅकॅडमी यांच्यावर कारवाई सुरु होताच, ॲकॅडमी चालाकांची धावाधाव सुरु झाली असून, अनेक ॲकॅडमी चालाकानी परस्पर ॲकॅडमीना कुलूप लावून परागंदा झाले तर काहींनी मुलांना परस्पर सुट्टी दिली तर काहींनी विद्यार्थ्यांना स्थलांतर केले ॲकॅडमीवर उशीरानेका होईना मात्र होत असलेल्या कारवाईचे नागरिकांनी प्रशासनाचे कौतुक केले आहे. ॲकॅडमीवर कायदेशीर कारवाई करणारी राज्यातील एकमेव नगरपालिका असून राज्यातील इतर ठिकाणी देखील याच स्वरूपाच्या कारवाई झाल्या पाहिजेत अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे. तर वृत्त केलेल्या दैनिक वृत्तपत्राचे आणि मोहसीन पठाण यांचे योग्य विषय हाताळल्या बद्दल समाजातून कौतुक केले जात आहे.

error: Content is protected !!