बारामतीत पुन्हा विमान कोसळले

बारामती : रेड बर्ड कंपनीचे प्रशिक्षणार्थी विमान बारामातीत पुन्हा कोसळले आहे, सह्याद्री आग्रो नजीक, लोखंडे वस्ती येथे विमान कोसळले असुन झालेल्या अपघातात विमानाचे नुकसान झाले आहे तर या विमानात असलेला प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजले नाही, दोन दिवसांपूर्वी याच कंपनीचे विमान बारामतीत कोसळले होते, मात्र या प्रशिक्षणार्थी संस्थेच्या प्रशिक्षणार्थीचे अपघाताचे प्रमाण मागील काही महिन्यात वाढले आहे, होत असलेल्या अपघाताचे कारण प्रशिक्षण संस्था पुढे आणत नाही, अपघाताबाबत कमालीची गोपनीयता ठेवली जात आहे, मात्र अपघात वारंवार होत आहेत.