October 24, 2025

आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही… मनोज जरांगे पाटील

IMG-20231020-WA0080

मनोज जरांगे पाटील यांची तोफ बारामतीत धडाडली……………….

बारामती : सरकार कोंडीत सापडले आहे मात्र आपली कसोटी आहे ही लढाई आपल्याला जिंकायची आहे आत्ता सुट्टी द्यायची नाही, इतर समाजाला आरक्षण देताना अनेक पोटजातींना आरक्षण दिले मग मराठ्यांची पोट जात कुणबी ही पोट होत नाही का ? असा सवाल उपस्थित करत, मी माझ्या जीवनात एवढे निष्ठुर सरकार कधीच पाहिलं नाही, आता मी आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी बारामतीत व्यक्त केला.

बारामतीत मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

 पुढे जरांगे पाटील म्हणाले की  शांततेत सुरू असलेले हे आंदोलन थांबवण्याची ताकद नाही एकातही नाही, हे आंदोलन 24 तारखेनंतर सरकारला पेलावणार नाही तेव्हा माझ्या समाज बांधवांनो गाफील राहू नका, आपल्या गावातला घराघरातला मराठा सावध करा, येत्या 22 तारखेला पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहे, ही संधी सोडू नका आसे समाज बांधवांना आवाहन केले.

हे आंदोलन शांततेत सुरू आहे आणि शांततेत सुरू राहणार आपले आंदोलन सध्या अंतिम टप्प्यात आहे, आपल्यात काही नमुने भारी आहेत जे आरक्षण नको म्हणतायेत त्यांनी आपल्याला आरक्षण शिकवले नाही मात्र आपल्या मराठ्यांच्या पिढ्यानपिढ्या त्यांनी बरबाद केल्या त्यांच्यामध्ये काही असे आहेत ज्यांनी आरक्षण घेतले आहे आणि तेच म्हणतायेत आरक्षण नको सावध व्हा ही पहिली आणि शेवटची संधी आहे अशी संधी पुन्हा नाही, मी भीत नसतो भिण्यासाठी माझ्याजवळ गमावण्यासारखे काहीच नाही, माझ्याजवळ जे आहे तो हा माझा माझ्या समाजाचा जनसमुदाय तीच माझी ताकद आहे. त्याच्यामुळे माझं गेलं तर काहीच जाणार नाही तर आज याचा बालेकिल्ला त्याचा बालेकिल्ला हा दणका सुरू आहे हे राज्य जनतेचे आहे मी बालेकिल्ला बिल्ला मानत नाही, जनतेचे राज्य आहे आमच्या समाजाचे प्रश्न आधी सोडवा मग तो येवल्याचा…. का  तो बीडचा,… का तो बारामतीचा हे मी पाहत नाही आम्ही तुमची मदत केली तुम्ही देखील आम्हाला आपलं मानता मग केलेल्या उपकाराची परतफेड कधी करणार असा सवाल राज्यकर्त्यांना उपस्थित केला.

 तर 40 दिवस संपले की तुम्ही आरक्षण कसे देत नाही तेच मी बघतो, सरकारला वेळ आपण दिला नाही त्यांनी वेळ घेतली आहे, त्यामुळे सावध व्हा ही वेळ परत येणार नाही सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला काहीच अडचण येणार नाही, तोंडाजवळ आता घास आला आहे आणि काही लोक म्हणतात आम्हाला नको आम्हाला नको, अरे तुम्हाला नको असेल तर तुम्ही घेऊ नका, आम्हाला आरक्षण पाहिजे, ज्याला पाहिजे ते घेतील, ज्याला नाही पाहिजे त्यांनी गुपचूप बसावं नाहीतर सगळ्यात आधी हे नको म्हणणारे हेच लोक दाखला घ्यायला पुढे जातील, दाखले घेतील त्यातल्या जवळपास अनेकांनी कुणबी दाखल्याचे प्रमाणपत्र काढली देखील आहेत तेव्हा सावध रहा सध्या ही संधी पुन्हा नाही, आरक्षण मिळेपर्यंत मी एक इंचही मागे सरकणार नाही हे कसे देत नाहीत तेच बघतो तयारीला लागा असा निर्धार जरांगे पाटील यांनी बारामतीत बोलताना व्यक्त केला.

तर मनोज जरांगे पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण का महत्त्वाचं आहे ? याविषयी यावेळी व्यक्त केले. त्यांनी मराठ्यांच्या घरातील सध्या परिस्थितीत काय विदारक आहे, या विषयी अत्यंत मार्मिकपणे भाष्य केले आहे. “आपल्याला जो विषय हाताळायचा आहे तर त्याच्या मुळात जा. जे आरक्षणाच्या मुळात गेले त्यांनी आरक्षण घेतलं. आपल्याला जीवन जगण्यासाठी पाणी गरजेचं आहे तेवढंच भविष्यात अस्तित्व टिकवण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे”, असे मनोज जरांगे यावेळी व्यक्त केले.

You may have missed

error: Content is protected !!