बारामतीत श्री कुलदेवी सह साडेतीन शक्तीपीठांचा मूर्तीरूप दर्शन महोत्सव.
बारामती : श्री तुळजाभवानी माता, करवीरनिवासीनी श्री अंबाबाई, वणीची श्री सप्तशृंगी माता, माहूरची श्री रेणुका माता तसेच राजस्थान आणि गुजरात मधील जैन, माहेश्वरी, सकल राजस्थानी समाजाच्या जवळपास 48 कुलदेवींची हुबेहूब मूर्ती ही नवरात्रीच्या पावन दिवसात प्रथमच आपल्या बारामती नगरीमध्ये दर्शन, पूजा-अर्चना साठी श्री कुलदेवी दर्शनाचे महोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले
शहरातील श्री महावीर भवन येथे शनिवारी 21 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजल्यापासून तसेच दि. 22 आणि दि. 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 ते संध्याकाळी 9 पर्यंत दर्शन सेवा उपलब्ध राहणार आहे. या महोत्सवामध्ये सर्व कुलदेवींची रोज आरती, भजनाचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व कुलदेवींची थोडक्यात माहिती, आख्यायिका यांचे देखील माहितीपत्रक लावले जाणार आहेत.
या पुण्यदायी, सामाजिक तथा धार्मिक महोत्सवाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री कुलदेवी दर्शन महोत्सव समितीचे सदस्य स्वप्रिल मुधा, गुणेश
भेडा, सीए सम्राट सोमाणी, मंदार सिकची, सचिन बोरा, सुयोग मुधा, गौरव कोठाडिया, सचिन मुथा यांनी केले आहे.
