बारामतीत शिकाऊ विमानाचा अपघात
बारामती : बारामतीतील विमानतळा नजीक रेड बर्ड या कंपनीच्या शिकाऊ विमानाचा गुरुवारी संध्याकाळी लॅडिंग करीत असताना अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या अपघातामध्ये पायलट किरकोळ जखमी झाला असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नाही. या अपघातामध्ये विमानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून या अपघाताच्या संदर्भाने अधिक माहिती घेण्याचे काम सुरु आहे.
